सिंदीत सर्पदंशाने महिला शेतमजुराचा मृत्यू..
🔥 मौजा मांगली शिवारातील घटना.
सिंदी (रेल्वे) : शेतात कापूस वेचणी करत असताना येथील महिला शेतमजुराचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मांगली शिवारात घडली. शोभा वसंता मसराम वय अंदाजे 50 वर्ष असे मृत शेत महिला मजुराचे नाव आहे. याप्रकरणी सिंदी पोलिसांची घटनेची नोंद घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
येथील वार्ड क्रमांक 12 मधील चीचघाटपुरा येथील रहिवाशी शोभा वसंता मसराम या शेतमजूर असून दिनांक 31/01/2024 रोजी मौजा मांगली शिवारातील शेतकरी अकिल शेख यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, दुपारी दीड वाजताच्या सुमारास कपाशीच्या पाला पाचोळ्यात दडून बसलेल्या विषारी कोब्रा जातीच्या सापाला महिलेच्या पायाचा स्पर्श झाल्याने सापाने चावा घेतला. सापाने पायाला चावा घेताच महिलेने ओरडून इतर शेतमजुरांना साप चावल्याची माहिती दिली.
शेतकरी अकिल शेख व शेतमजुरांनी तातडीने महिलेला स्थानिक आरोग्य वर्धिनी केंद्रात आणले. परंतु, शोभा मसराम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठविण्यात आले. परंतु, हमदापुर गावानजीक रस्त्यातच मसराम यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. शोभा मसराम यांच्या मृत्यूमुळे चीचघाट परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे