आष्टी शहीद : येथुन नजीकच असलेल्या व राजकीय दृष्ट्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या अंतोरा गावात गेल्या स्मशानभूमी नाही आहे . मृतकाचे अंत्यसंस्कार हे उघड्यावर करावे लागत आहे.देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. परंतु गावात स्मशान भुमी नाही हे वास्तव आहे.अंतोरा गाव तालुका स्थरापासून १२ किमी अंतरावर आहे. गावात भरपूर प्रमाणात नेते मंडळी आहे पण आजही गावात स्मशान भूमी नसने ही चिंतेची बाब आहे. जागाच उपलब्ध नाही तर स्मशानभूमी होईल कशी ? असा सूर गावकरी काढत आहे. हे गाव राजकीय दृष्ट्या नामांकित असून अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. या गावामध्ये नवीन अंतोरा ते जुना अंतोरा हा दीड किमी चा रस्ता खुप बेकार झाला आहे.याकडे कुणाचे लक्ष नाही. गावामधे घरकुलचा प्रश्न ऐनरीवर आहे. या विकासात्मक बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष येत असल्याचे दिसून येतो आहे.यामुळे अनेक समस्यांचे गावाला ग्रहण लागले आहे.