हिंगणघाट : बाजार समिती ही एड सुधीर कोठारी यांच्या समर्थ नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्शवत बाजार समिती म्हणून नावारुपाला आलेली असून या बाजार समितीच्या कार्याने आपण प्रभावित असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस आमदार रणजितदादा कांबळे यांनी केले.ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अभियांत्रिकीच्या शेतकरी पाल्याना लॉपटॉप वितरण व आपदात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश वितरण व जेसीबी व रोड रोलर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे आज सोमवार दि.5 फेब्रुवारीला आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी माजी आमदार राजू तिमांडे, वर्धा बाजार समितीचे सभापती अमित गावन्डे, आर्वी चे संदीप काळे,पुलगावचे मनोज वसू, आष्टीचे राजेंद्र खवशी,सिंदी रेल्वे चे केशरचंदजी खंगार, समुद्रपूरचे हिम्मतभाऊ चतुर, भाजपचे आकाश पोहाणे, व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ कांबळे यांनी हिंगणघाट बाजार समितीने आपल्या विविधांगी योजनाची माहिती जिल्ह्यातील अन्य बाजार समितीना देऊन सहकाराचे जाळे जिल्ह्यात मजबूत करण्याचे आवाहन केले. एड सुधीर बाबू यांच्या कणखर व शेतकरीभीमुख कार्याने ह्या बाजार समितीची ओळख सर्व महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे गौरवदगार यावेळी काढले.माजी आ राजू तिमांडे यांनी बाजार समितीच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.व बाजार समितीच्या हितासाठी सदैव मदत करण्याचे आश्वासन दिले.सभापती एड सुधीर कोठारी यांनी मागील 23 वर्षात केलेल्या विविध विकास कार्याची माहिती देऊन शेतकरी केंद्रबिंदू मानून करीत असलेल्या व भविष्यात करावयाच्या कार्याची माहिती दिली. मार्केट यार्ड वर एक रुपयात शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था, शेतकरी निवास व्यवस्था, संपूर्ण यार्डला सुरक्षा भित व 24 तास सुरक्षा व्यवस्था, कापूस लिलावा करिता 5 शेडची उभारणी, गुरां करिता शेडची व्यवस्था, महिला व पुरुषा करिता शौच्छालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्या करिता आर ओ प्लॉन्ट सह प्याऊची सुविधा, यासह शेतकरी हितासाठी राबवित असलेल्या विविध योजनाची माहिती दिली तसेच कांनगावं उपबाजार येथे केवळ एक हजार रुपयात भवन उपलब्ध करून देण्यात येत असून ही योजना पुढील काळात हिंगणघाट, अल्लीपूर, व वडनेर येथेही सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक गावातील स्मशान भूमीवर गावच्या लोकसंख्ये नुसार बसण्यासाठी बॅंचेस बाजार समिती मार्फत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक मधुसूदन हरणे यांनी केले. यावेळी अतिथीचे स्वागत संचालक डॉ निर्मेश कोठारी, राजेश मंगेकर, प्रफुल्ल बाडे, यांनी केले.
याप्रसंगी आ कांबळे यांचे हस्ते शेतकरी पाल्याना लॉपटॉप चे वितरण करण्यात आले. 127 शेतकरी मुलांना ह्या लॉपटॉपचे वितरण करण्यात आले. मागील बारा वर्षा पासून सातत्याने अभियांत्रिकीला शिकणाऱ्या शेतकरी पाल्याना अर्ध्या किंमतीत लॉपटॉप चे वितरण करण्यात येत आहे.तसेच यावेळी 27 शेतकरी वर्गाला विविध आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.यात एक बैल मृत्यू झाल्यास दहा हजार रुपये व दोन बैलांचा मृत्यू झाल्यास 15 हजार रुपये व अचानक लागलेल्या आगीत शेतातील गोठा भस्मसात झाल्यास 7500 रुपये धनादेश बाजार समिती मार्फत देण्यात येतो
यावेळी बाजार समिती मार्फत शेतीच्या मार्गवरील पांधन रस्त्याचे जे अतिक्रमण झाले आहे त्यामुळे शेतीकाम करतांना अडचणी वाढल्या आहेत.ह्या पांधन रस्त्याचे अतिक्रमण दूर झाले तर शेत मालाची वाहतूक,व शेतीचे व्यवस्थापन हार्वेस्टिंग, प्रेसिंग, पेरणी तसेच रात्री बे रात्री शेत व्यवस्थापण सुकर व्हावे व वाहतुकीच्या दृष्टीने फार मोठी अडचण होत आहे यासाठी बाजार समितीने यापूर्वी 35 गावाचे 73 की मी पांधन रस्त्याचे मातीकाम केले आहे. परंतु हा खर्च जास्त होत असल्याने पांधन रस्त्याचे अतिक्रमन दूर करण्यासाठी बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी रोड रोलर व जेसीबी विकत घेऊन शेतकरी वर्गाच्या हिताच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.
याप्रसंगी जेसीबी व रोड रोलरचे लोकार्पण आ रणजित दादा कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सुरेंद्र कुकेकर माजी संचालक शेष येर्लेकर, पांडुरंग निबाळकर, समुद्रपुरच्या नप अध्यक्ष योगिता तुळणकर, वामनरावं चंदनखेडे,कामगार नेते आफताब खान, निलेश ठोबरे, विठ्ठल गुळघाने, अशोक वंदिले,बाजार समितीचे संचालक उपसभापती हरीष वडतकर, मधुकररावं डंभारे, ओमं प्रकाश डालिया, उत्तमराव भोयर, प्रफुल्ल बाडे, अशोक उपासे, राजेश मंगेकर, डॉ निर्मेश कोठारी, घनश्याम येर्लेकर, पंकज कोचर, ज्ञानेश्वर लोणारे, शुभ्रबुद्ध कांबळे, सौं माधुरी चंदंनखेडे, सौं नंदा चांभारे, हर्षद चांभारे, संजय कात्रे, व मान्यवर उपस्थित होते.
संचालन दीपक माडे यांनी केले. सचिव टी. सी चांभारे यांनी आभार मानले.