(वर्धा) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध योगीराज संत भिकाराम माऊली यांच्या आज्ञाने संत भगवान माऊली हे भंडारा जिल्हा कायम स्वरूपी सोडून वर्धातील आर्वी तालुक्यात स्थायिक झालेत. त्यानंतर प्रथमचं अवलिया संत भगवान माऊली यांचा दि. 30 जानेवारी 2024 ला 39 वा जन्मोत्सव आर्वी शहरांत नुकतेच पार पडले. यावेळी आर्वी येथील रेणुका महिला भजन मंडळ, संतोषी नगर , तसेच भिवापूर तालुक्यातील निर्मला माता भजन मंडळ बेसूर (नांद)यांनी प्रामुख्याने मिरवणुकीत सहभाग घेतला असून इतरही भक्त कार्यक्रमस्थळी उपस्थित होती.यावेळी पाहुणे म्हुणुन वर्धा जिल्हा शिवसेना प्रमुख गणेश ईखार यांनी भेट दिली.संजुभाऊ देवघरे, प्रशांत लोखंडे,बाल्याभाऊ काळे , प्रवीण सूर्यवंशी, आर्वी नेहरू मार्केटमधील समस्त सब्जी व्यापारी बंधूनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सतीश डोळस गुरुजी, मंगेशजी हेडाऊ,अंबादास खंडारे, नामदेवराव दविले, सुभाषभाऊ रोहणकर दहेगाव मुस्तफा, विकी चेके, गजानन चेके चिखली बुलढाणा, भुजंगभाऊ धुडाट, विजय जुमडे मेहकर यांनी अथक परिश्रम घेतले. मिरवणुकीनंतर लगेंच महाप्रसादाला सुरुवात झाली.यावेळी 800-900 लोकांनी रात्री 11:00 वाजेपर्यंत प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेतला.