सेलू : स्थानिक वर्धा जिल्ह्यातील जलजीविका आणि मिशन समृद्धी वर्धा याचा संयुक्त विद्यमानाने सेवाग्राम येथील यात्री निवास येथे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले.या प्रशिक्षणाला मिशन समृद्धीचे 21 गावातील पंचायत संसाधन व्यक्ती व 8 तालुक्यातील प्रोग्राम कॉर्डिनेटर उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यमान जलसंचय, तंत्रज्ञान आणि डेव्हलपमेंट मॉडेलच्या माध्यमातून उपजीविकेच्या संधी तसेच पंचायत संसाधन व्यक्तींची क्षमता बांधणी करून मत्स्य व्यवसाय आधारित उपजीविकेच्या संधी याबाबत दोन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले.पहिल्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात पीआरपी यांचे रजिस्ट्रेशन करून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. जलजीविकेचे सल्लागार तज्ञ मा. समीर परवेज यांनी पहिल्या सत्रात प्रशिक्षणाचे उद्दिष्ट शेती संभाव्य जलस्त्रोतांसह मत्स्यपालनाची व्याप्ती या विषयावर मार्गदर्शन केले.त्यानंतर मिशन समृद्धीचे राज्य कार्यक्रम व्यवस्थापक किशोरजी जगताप यांनी उपजीविकेच्या संदर्भात मिशन समृद्धीची भूमिका यासंदर्भात मार्गदर्शन केले. यानंतर दामिनी अखंड यांनी एकात्मिक शेती संबंधित मार्गदर्शन केले. त्यानंतर सोहेल रामटेके यांनी यांनी मत्स्य संगोपन व त्यावर आधारित तांत्रिक विपणन यासंदर्भात मार्गदर्शन केले दुपराच्या सत्रात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना यासंदर्भात पीआरपींना मार्गदर्शन केले.प्रियंका झोड यांनी मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ घेता येईल या संबंधित मार्गदर्शन केले. प्रमोद पटोले यांनी गाव पातळीवर माहिती कशी गोळा करावी या आधारित मार्गदर्शन केले.आणि दुसऱ्या दिवशी ला अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले या अभ्यास दौऱ्यामध्ये वाडगाव ( जंगली)येथे जलजीविकेच्या माध्यमातून (Mini RAS) रिसर्क्युलेट एक्वा कल्चर सिस्टम या मॉडेलची पाहणी करण्यात आली, कमी जागेमध्ये कशा पद्धतीने मस्त पालन व्यवसाय करू शकतो या मॉडेल च्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यानंतर गिरोली येथे हर्षवर्धन दुर्गे यांच्या शेततळ्याला भेट देऊन जलजीविकेच्या मार्गदर्शनाखाली या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये स्पॉन टू फिंगर लिंग मासे कशा पद्धतीने केले गेले हे दाखवण्यात आले.सदर कार्यक्रमाचे जलजीविका सेंटर फॉर एक्टिक लाईव्हलिहूड संस्था पुणे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ मिश्रा तसेच पदमाकर बोजा प्रकल्प अधिकारी यांच्या संकल्पनेतून यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. मिशन समृद्धीचे सर्व कार्यक्रम समन्वयक तसेच जलजीवीका टीम, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पुसदकर यांनी केले व गणेश तुळसकर यांच्या आभार प्रदर्शनाने प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.