हिंगणघाट येथील ओबीसी बाईक महारॅली..
हिंगणघाट./ आज दिनांक :११ फरवरी २०२४ रोज रविवारला ओबीसी संघर्ष समिती, हिंगणघाट द्वारा हरीओम मंगल कार्यालय येथून सकाळी ठीक ११:०० वाजता शहरातील सर्व ओबीसी बांधव यांनी पूढे येणाऱ्या दिनांक:- १५ फेब्रुवारी २०२४ रोज गुरुवारला ठीक ११:०० वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबद्दल जनजागृती म्हणून उठ ओबीसी जागा हो ! संघर्षाचा धागा हो!! जय ओबीसी! जय संविधान!! या ब्रीद वाक्यानुसार ओबीसी बांधवानी दुचाकीद्वारे( मोटरसायकल ) रॅली हरी ओम मंगल कार्यालयापासून शहरातील मुख्य रस्त्याने डाॅ.आंबेडकर चौक ते विठोबा चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते संत तुकडोजी चौक ते तहसील कार्याल ते लक्ष्मी टॉकीज चौक ते डॉ.आंबेडकर चौक पासून पुढे बस स्टॅन्ड चौक येथून संत कवंराम भवन मार्गे सरकारी दवाखाना चौक ते राष्ट्रीय महामार्ग ने नंदोरी चौक ते भारत पेट्रोल पंप ते हरिओम कार्यालयापर्यंत रॅलीचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला.ओबीसी समाजावर भविष्यात होणारा परिणाम व अन्यायाच्या विरोधात लढण्याकरिता ओबीसी संघर्ष समितीतर्फे जो दिनांक :१५ फेब्रुवारी २०२४ ला ओबीसीच्या मुख्य मागण्याकरिता सरकारला जागे करण्याकिरता महामोर्चा चे आयोजन केले आहे. त्यातील मुख्य मुद्दे खालील प्रमाणे आहे. १).दिनांक :२६ जानेवारी २०२४ च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार ओबीसी प्रवर्गात मराठ्यांच्या सरसकट समावेश झाल्यास आपल्या संविधानात्मक हक्क हिरावला जाईल .२). ओबीसी प्रवर्गातील युवक- युवतींच्या नोकर भरतीवर याचा मोठा परिणाम झाल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होईल. ३).सगेसोयरे ह्या असंदिग्ध हा शब्द अधिसूचनेमध्ये असल्याने सर्व मराठा समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होईल.४). इतर मागासवर्गीय ,भटके विमुक्त, बारा बलुतेदार ,विशेष मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील सुद्धा संवैधानिक व न्यायिक हक्कावर गदा येईल. ५).ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनेत मिळणारे विद्यावेतन बंद होईल.६). तसेच ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे .या प्रमुख मागण्याकरिता महामोर्चा चे आयोजन केले आहे. तरी या महामोर्चा मध्ये ओबीसी बांधवांनी व भगिनींनी प्रचंड संख्येने सामील व्हावे. अशी संघर्ष समितीच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.
महामोर्चा ! महामोर्चा !! महामोर्चा!!! उठ ओबीसी जागा हो !! संघर्षाचा धागा हो!!!
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24