विद्यालयातील 120 विद्यार्थ्यांनी घेतले सैनिकी प्रशिक्षण.
पुलगाव/विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये सामील होवून देशसेवा करावी करिता स्थापित, जिल्यातील एकमेव सैनिकी शाळा, इंडियन मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकताच हुसेनपुर भवानी मंदिर टेकडी परिसरात पार पडले. या प्रशिक्षणाला सी ए डी कॅम्प पुलगाव येथील लेफ्टनंट कर्नल आदित्य कुमार यांनी भेट देवून विद्यार्थांना देशसेवा करण्याकरिता सैन्यामध्ये जाण्यास प्रवृत्त केले.. या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थांना रात्रीच्या अंधारात जंगलामध्ये वेगवेगळे स्थळ कसे शोधून काढायचे (नाईट रूट मार्च), रात्री शत्रूचा हल्ला झाल्यास त्याला प्रतिउत्तर कसे द्यायचे (स्टँड टू), शत्रू वर हल्ला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती,ताऱ्यांच्या आकाशातील स्थानावरून रूट कसा शोधायचा (स्टार गेझिंग), फायरिंग, घोडसवारी ,टेन्ट पिंचींग, कुकिंग, टेन्ट ले आऊट या सारख्या साहसी कृत्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
विद्यार्थ्यांची देशसेवेची भावना वृधिंगत विद्यालयातील 120 विद्यार्थ्यांनी या तीन दिवसीय सैनिकी प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला.
विद्यालयाचे कमांडंट कर्नल के.एच पाटील व प्राचार्य श्री रविकिरण भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली, सुभेदार सुनील मोहोड,नायब सुभेदार महेश अळसपूरकर तथा प्रा. प्रवीण शेळके यांनी विद्यार्थांना प्रशिक्षण दिले.
शिबिराचे आयोजन करण्याकरिता विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नितीन कोठे, कोहळे सर, आशिष साळवे, हागे सर, रीलेश उरकुडे,अमोल कडू, प्रसाद मोरे, पंकज कडू, तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विरूळ चे सरपंच अड.दुर्गाप्रसाद मेहरे तथा गावकरी मंडळींनी यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य केले. नेहरू विद्यालयाचे माजी प्राचार्य शिबिराला भेट देवून विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे अध्यक्ष मनोज भेंडे,सचिव कृष्णाभाऊ कडू यांनी शिबिर यशस्वी केल्याबद्दल स्टाफ चे अभिनंदन.