हिंगणघाटदि/तालुक्यात ग्रामीण भागात काल शनिवारी सायंकाळी अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणात गारपिट प्रकार झाल्यानंतर आज रविवारी पुन्हा सायंकाळी ४ वाजता हिंगणघाट शहरातही वादळी वाऱ्यासह गारपिट झाले, सुमारे अर्धा तास पर्यंत ही गारपीट मोठया प्रमाणावर झाल्याने फूटपाथ दुकादारांची, कवेलू असलेल्या झोपडीवजा घरांचे मोठे नुकसान झाले.शेत शिवारातील पिकांचेसुद्धा नुकसान झाले असून कालपासून असलेल्या सुट्ट्यामुळे शासकिय कार्यालये बंद असल्याने काल व आज झालेल्या नुकसानीबद्दल अजूनही कृषि व महसूल विभागाकडून अहवाल प्राप्त झाला नाही. अनेक संबंधीत अधिकारी सुट्टया असल्याने मुख्यालयी हजर नाहीत.वडनेर विभागातील आजनसरा,फुकटा,हिवरा, सिरसगाव या भागात शनिवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पिके उध्वस्त झाली असून गारपीटीचा मोठा तडाखा गहू व चना, कापूस इतर पिकांना मोठा बसला आहे.तालुक्यातील पिपरी पोहना, आजनसरा, नांदगाव(कां), कापसी, मोझरी(का), पवनी, बोपापुर, हिवरा येथेही वादळी वाऱ्यासह गारपिटीचे प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे.शनिवारी पिपरी, वेणी, जांगोणा, हिवरा, बोपापुर या गावांमध्ये गारपीट झाली, कुठे बोरांचे आकाराची तर कुठे आवळ्याचे आकाराची गारपीट, शेत शिवारातील गोठ्यामध्ये उघड्यावर बांधुन असलेले शेतकऱ्यांचे पशुधन गारपिटीचे तडाख्यात सापडले असून जनावराची जीवहानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.काही गावांमध्ये गारपीट व पावसामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता.हवामान खात्याने यापूर्वीच या परिसरात पावसाचा अंदाज वर्तविला आहे,सावधानी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने कालपासून शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणू नये अशी सूचनाही दिली होती काल व आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद होते. अशातच काल सायंकाळी ७ वाजताचे दरम्यान तालुक्यात अचानक पावसाळी वातावरण निर्माण होऊन वादळ वारे सुरू झाले अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसला काल हिंगणघाट शहरातही तुरळक प्रमाणात पाऊस आला परंतु आज सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिट झाले. जोरदार पावसासह गारपीट जवळ्पास ४० मिनिटे सुरूच होते.काल तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट झाल्या नंतरही शहरात फक्त तुरळक पाऊस पडला होता, परंतु आज रविवारी मात्र थोडा वेळ का होईना, अतिवृष्टीसह जोरदार गारपिटीचा तडाखा शहरासह ग्रामीण भागातही बसला.