वडगाव (खुर्द) सेलू येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी…
सेलू / तालुक्यातील वडगाव (खुर्द) येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली.तसेच गाडगेबाबा हे महाराष्ट्र राज्यातील एक महान समाज सुधारक होते.२३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती येथे जन्मलेल्या गाडगे महाराजांना त्यांनी केलेल्या कार्यामुळे स्मरण केले जाते संत गाडगेबाबा आजही देशभर विदेशात महाराष्ट्रात एक आदरणीय संत आहे.आणि अनेक वर्षांपासून संत गाडगे महाराजांचे मोलाचे विचार येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.त्यांचीच प्रेरणा घेऊन वडगाव खुर्द येथील भजन मंडळांनी प्रबोधन करून संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व मला अर्पण करून तसेच गाडगेबाबा महाराजांच्या जीवनावर गायन करून भजनाचा कार्यक्रम पार पाडला तसेच त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व धर्म समभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा या संस्थेच्या संस्थापिका,दिपमाला मालेकर, सल्लागार पंकज येसनकर,भजनी कलावंत,नागनाथ भजन मंडळ,लक्ष्मी माता भजन मंडळ,हेमलता महाकाळकर,मंदा महाकाळकर,शीला येलोरे,ललिता राऊत,माया ढोढरे, गुंफा मोगरकार,दुर्गा कंबाले गीता तीतरे,ताई उईके,गुंफा लटारे,रुखमा नरताम,श्रीकांत ढोढरे, शंकर मुडे ,ढोनबाजी मुडे, मधुकर लटारे ,बबन रानडे, अशोक खोडे ,जीवन कंबाले, प्रमोद नानोटे ,जनार्दन सावरकर, मारुती माहुरे, देविदास भटोरे ,मयूर बंडे, नामदेव सावरकर, सौरभ भटोरे, आदींच्या उपस्थितीमध्ये संत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी करण्यात आली.
चैताली गोमासे साहसिक न्यूज /24 सेलू