नांदोरा (डफरे )येथे त्रिवेणी महायज्ञ समारंभ..

0

व संगीतमय भागवत कथेचे आयोजन.

देवळी / तालुक्यातील नांदोरा (डफरे) येथे ज्ञानेश्वर माऊली देवस्थानामध्ये त्रिवेणी महायज्ञ व संगीतमय भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.संगीतमय भागवत कथा गुरुवर्य रमेश महाराज मानकर हे सांगणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार २४ फेब्रुवारी ते शनिवार २ मार्चपर्यंत चालणार असून या कार्यक्रमांमध्ये दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्रिवेणी महायज्ञात कीर्तनकार गजानन कपिले,राजेंद्र मस्के, केशव चावरे, गणेश शिंदे, प्रीतम भोयर, उमेश जाधव, संजय ठाकरे, आणि, रमेश महाराज मानकर, यांचे कीर्तन होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केलेले आहे. या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काकड आरती भजन ग्राम दिंडी संगीतमय भागवत महिलांचे भजन वारकरी संप्रदाय कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये पद्माकर दोड, मोहन निस्ताने,गुलाबराव डफरे, वसंतराव इंगोले,जीवन कारंजेकर, भानुदास डफरे,निवृत्ती हाडके,प्रकाश डफरे,गोपाळराव बोटफोले,नारायण गोडे, हरिश्चंद्र डफरे,सुधाकर क्षीरसागर,विनोद डफरे,अशोक उईके, सुनील वाघ,प्रवीण लाडेकर,गीता गोपाळकर,ही विश्वस्त मंडळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राबत आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज 24/ देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!