पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे मराठी राजभाषा दिनानिमित्त वृक्षारोपण..

0

 वर्धा / समुद्रपुर येथे मराठी राजभाषा दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला असून वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे दिसून येते.एक सूर एक ध्यास छेडितो मराठी,एक संघ, एक बंध गुंजितो मराठी,एक श्वेत,अनेक रंग रंगतो मराठी,एक बोध, एक विचार मांडतो मराठी.”२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणजेच मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा दिवस. दरवर्षी २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कुसुमाग्रज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.दि.२७/०२/२०२४ रोजी मराठी राज्य भाषा दिनानिमित्त व पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या शहर अध्यक्षा मा.सौ.लतिका नितीन डगवार यांच्या लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून.नितिनजी डगवार यांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी येथील मुख्यध्यापक.मिलिंद वावरे सर उपस्थित होते.तसेच पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वर्धा जिल्हा उपाध्यक्षा नमिता पाठक,शहर उपाध्यक्ष नेहा मैदापवार,सचिव ज्योत्स्ना वागदे,दीपाली मेंढे, सुवर्णा वानखेडे,कोमल शिरोडे, लता सुटे,सिमा टेकाम, प्रियल डगवार,संजना बघेल,भार्गव डगवार, संजना बघेल, उदांशू धोटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!