देवळी /स्थानिक रहिवासी अक्षय झोरे यांनी १ लाख २५ हजार रुपये श्रीराम फायनान्स मधून कर्ज घेतले. ६ हजार ५०० रुपये मासाीक किस्त होती. दरमहिना नियमित कर्ज भरणे सुरू होते. परंतू अक्षय झोरे यांचे वडीलांचे दु:खद निधन झाल्यामुळे १ महिने गाडीचे कर्ज स्थगित राहले. दि. ४/४/२०२४ रोजी श्रीराम फायनान्स एजंट शानु शेख याने अक्षयला गाडी किरायानी पाहीजे असे सांगून टाटा २०७ एम.एच. १२ एफ.डी ७१४९ क्रमांकाची गाडी घेवून गेले. अक्षय झोरे यांना मारहाण करुन गाडीचे खाली उतरवून दिले आणि गाडी घेवून गेले. आणि गाडी परत पाहीजे असेल तर ४५ हजार रुपयाची मागणी शानु शेख या एजंटनी केली. श्रीराम फायनान्स कंपनीच्या या गुंड्यांना न घाबरता रितसर पोलीसात तक्रार देण्यात आली. गुंड शानु शेख रा. हिंगणघाट व श्रीराम फायनान्सचा मॅनेजर याच्या विरोधात बळजबरीने गाडी हिसकावून पैशाची मागाण्ी करणे असे २ गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारकर्ते अक्षय झोरे यांनी केली आहे. कोणत्याही कंपनीचे कर्ज असेल तरी फायनान्स कंपनीला कायदेशिर अर्ज द्यावे लागते. तसेच गाडी सिझींग करायची असल्यास संबंधित पोलीस स्टेशनला रितसर पत्र देवून स्टेशन डायरीला नोंद द्यावी लागते. अशी कोणतीही माहिती पोलीस स्टेशन देवळी यांना दिली नाही. उलट गाडी छुडाना है तो मुझे (म्हणजे शानु को १५ हजार देना पडेगा) अशा प्रकारे धमकी देवून सामान्य ग्राहकाची फसवणुक केल्या जात आहे. तेव्हा देवळी ठाणेदार श्री. सार्थक नेहाते यांनी लक्ष घालून आरोपी शानू शेख याचा बंदोबस्त करावा अशी मागणी साहसिक जनशक्ती संघटनेनी केली आहे.