शेती नावावर करून मागण्यासाठी आला होता आष्टीत.मुतक किशोर नें आईला मारहाण करून वाहणाचा काच दगडाने फोडला म्हणून वाद पोहचला विकोपाला.
आष्टी (शहीद) / नवीन आष्टी पुनर्वसन कॉलनी परिसरात भाडयाच्या घरात राहणाऱ्या पार्डी तालुका कारंजा घाडगे येथील रहिवाशी लहान भाऊ ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू नामदेव ढबाले याने मोठा भाऊ किशोर नामदेव ढबाले वय ४० वर्ष राहणार पार्डी ता. कारंजा यांना काठीने व दगडाने मारहाण करून हत्या केली ही घटना दि.१६एप्रिल रोजी दुपारी १० वाजता च्या सुमारास नवीन आष्टी येथील पुनर्वसन कॉलनी येथे घडली.घटनास्तळी मुतकाला पाहण्यासाठी हजारोची गर्दी उसळली होती.सविस्तर असे कि,कारंजा (घा.)तालुक्यातील पार्डी नामदेव ढबाले यांना दोन मुले असून मोठा मुलगा पार्डी गावात राहत आहॆ.तर दुसरा मुलगा लहान असून तो विवाहित आहॆ.शेती ही लहान मुलाच्या नावावर असून मोठया मुलाला राहते घर दिले मात्र शेतीचा हिस्सा दिला नाही म्हणून मोठा मुलगा किशोर हा त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू यांच्या कडे शेती नावावर करण्यासाठी नेहमीच आष्टी शहरात लहान भावाकडे ऐ जा करित असे.लहान भाऊ ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू हा आई वडिलांना घेऊन नवीन आष्टी येथील पुनर्वसन कॉलनी मध्ये राहायला होता.गुड्डू यांच्या कडे बोलेरो पीकअप वाहन होते.ते वाहन चालवून तो आई वडिलांना संभाळात होता.दि.१६ एप्रिल रोजी मोठा भाऊ मुतक किशोर नामदेव ढबाले हा पार्डी गावावरून आज सकाळी ८ वाजता आष्टी शहरात पोहचला असता.लहान भाऊ आरोपी ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू यांच्याकडे मला शेतीचा सातबारा नावाने करून दे म्हणून भाड्याने राहत असलेल्या गुड्डू च्या घरी आला.मुतक किशोर ने आई सोबत वाद घातला व दगडाने मारहाण केली नंतर त्यांने गुड्डू च्या बोलेरो वाहणाच्या काच फोडला . काच फोडल्याने लहान भाऊ गुड्डू संतापला आणि किशोर ला जबरदस्त मारहाण केली व पुलावर ढकलून दिले किशोर च्या तोंडावर व डोळ्यात मार लागल्याच्या खुणा व रक्त श्राव होता. यातच किशोर ढबाले चा मुर्त्यू झाला. यां घटनेची वार्ता आष्टी शहरत पसरताच एकच खळबळ उडाली. घटनास्तळी नागरिकांनी गर्दी केली होती.आष्टी पोलिसांना यां घटनेची माहिती कळताच पोलीस कर्मचारी पंढरी धुर्वे घटना स्तळावर पोहचले. पंचनामा करून मूतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणी साठी आर्वी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला. आरोपी गुड्डू नामदेव ढबाले याला ताब्यात घेतले असून त्याची आई लता नामदेव ढबाले हिला चौकशी साठी ताब्यात घेतले आहॆ.वृत्त लिहिसतोवर कार्यवाही सुरु होती.मुताकाची पत्नी ही फिर्याद नोंद करण्यासाठी आली होती.पुढील तपास आष्टी पोलीस करित आहॆ.