मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ येथे विशेष दिनी विशेष सामुदायिक प्रार्थना…

0

अरुण देशमुख / यवतमाळ – येथे आज  22 एप्रिल रोजी मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी येथे 23 एप्रिल ला हनुमान जयंती असून हनुमान जयंतीचे औचित्य साधून मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी येथे. विशेष सामुदायिक प्रार्थना चे आयोजन करण्यात आले आहे.या प्रार्थनेला सर्व महिला मंडळी तसेच पुरुष मंडळी भरपूर संख्येने उपस्थित होते.मानवता मंदिर येथे रोज दैनंदिन प्रार्थना होत असते महिन्यातले काही विशेष दिन ठरविले असता अशा या दिनी प्रार्थनेला काही बाहेरून मान्यवर बोलावले असतात आजच्या या प्रार्थनेला हेल्थ क्लियर सेंटरचे काही डॉक्टर लोक उपस्थित होते.प्रार्थनेचे सूत्रसंचालन मानवता मंदिर भजन प्रभास समितीचे कोषाध्यक्ष तुकाराम जी राऊत यांनी केले प्रार्थनेत हार्मोनियमची साथ. भजन प्रवास समितीचे सचिव  रामदासजी घंगाळे यांनी दिली तर तबल्याची साथ भजन प्रभात समितीचे माजी अध्यक्ष अशोकराव गेडाम यांनी केली प्रार्थनेचे अर्जीपत नारनवरे दादांनी गायन केलं मानवता मंदिर भजन प्रभाव समितीचे उपाध्यक्ष  बजरंगी शेंडे यांनी टाळाची साथ दिली तसेच प्रार्थनेचे महत्त्व राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख. यांनी त्यांच्या वाणीतून भाषणाद्वारे सर्व गुरुदेव उपसकाला पटवून सांगितले रोज सामुदायिक प्रार्थना का करावी याचे महत्त्व.सर्व मंडळींना पटवून दिले या विशेष प्रार्थनेला आवर्जून उपस्थित असलेले पदाधिकारी रमेश जी महामुने सचिव मानवता मंदिर विजयराव इंगोले जॉइंट्स इंग्लिश मीडियम स्कूल स्कूल चे संगीत शिक्षक अतुल तातावार हे सुद्धा या प्रार्थनेला आवर्जून उपस्थित होते तसेच मानवता मंदिर चे कार्यकारणी मंडळी अशोकराव बोदडे व इतर मान्यवर या प्रार्थनेला आज हजर होते प्रार्थनेचे महत्त्व राष्ट्रसंत विचारमंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख त्यांनी प्रार्थनेचे महत्त्व पटवून दिल्यानंतर शांतीपाठ घेण्यात आला शांतीपाठ आटोपल्यानंतर सामुदायिकपणे गुरु देवाच्या अधिष्ठानाला नमस्कार करण्यात आला व शेवटी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयघोष करून प्रार्थनेची सांगता करण्यात आली.

साहसिक न्यूज /24 वर्धा – यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!