वायगाव (नि )-/ नजिकच्या ३ कि. मी. अंतरावर असलेल्या मिरापुर गावात श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा पारायण. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे विचार प्रवक्ते ह. भ.प.श्री पुंडलीक महाराज बोळवटकर पंढरपूर संस्था यांच्या अमृत तुल्य सुमधुर वाणीतुन दि. २२/५/२४ ते २९/५/२३ दरम्यान विविध रचनात्मक कार्यक्रमाचे आयोजन ह. भ. प. श्री नारायणराव इंगळे यांच्या माध्यमातून वच्छलाबाई ना. इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री हनुमान देवस्थान सभागृहात करण्यात आले. पावनभुमी मिरापुर या गावात धार्मिक आध्यात्मिक आणि जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत आहे. या करीता जांभूळकर परिवाराचे तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहेत. बाहेर गावावरुन आलेले गुरुदेव भक्त प्रचारक सर्व श्री रमेश दादा किनगावकर, श्री कृष्णा डबुरकर, श्री वामन मते. या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. दैनदिन कार्यक्रमात दि. २४/५/२४ला.सकाळी ध्यान प्रार्थना. ग्राम सफाई.नंतर यामधून.प्रभात फेरीचे भजनी दिंड्या सहित आयोजन करण्यात आले दु. १वा.गोपालकाला व महाप्रसादा नंतर राष्टवंनेने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी गुरूदेव भक्त तसेच भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.