राष्ट्रीय जनगणेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याबाबत श्री संताजी अखिल तेली समाज संघटन हिंगणघाट द्वारे पंतप्रधानांना निवेदन.
🔥राष्ट्रीय जनगणेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याबाबत श्री संताजी अखिल तेली समाज संघटन हिंगणघाट द्वारे पंतप्रधानांना निवेदन.
ओबीसी समाजाची होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र नोंद नसल्याने ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला असून होणाऱ्या जनगणनेत ओबीसीची स्वतंत्र नोंद नोंदवावी अशी मागणी असे संताजी तेली समाज संघटनेने उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साठी निवेदन सुपूर्द करण्यात आले.
भारताच्या २०२६ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना व स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याबाबत, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व वस्तुनिष्ठ आकडेवारी अत्यंत आवश्यक असते. आपल्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना सामाजिक न्यायाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.
ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाज हा देशातील मोठा व महत्त्वाचा घटक असूनही आजपर्यंत त्यांची स्वतंत्र व अचूक जनगणना झालेली नाही. परिणामी, त्यांच्या वास्तविक लोकसंख्येची, सामाजिक-आर्थिक स्थितीची व शासकीय योजनांमधील भागीदारीची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही.सध्या जनगणना शीटमध्ये ‘SC, ST, अन्य’ असा एकत्रित उल्लेख असल्याने ओबीसींची स्वतंत्र ओळख व आकडेवारी स्पष्टपणे समोर येत नाही. त्यामु़ळे ओबीसी समाजाच्या हक्कांच्या नियोजनात व अंमलबजावणीत अडथळे निर्माण होतात.
निवेदनाच्या माध्यमातुन मागणी करतो की –
भारत सरकारच्या २०२६ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी.
जनगणना फॉर्ममध्ये ‘SC, ST, अन्य’ या कॉलममध्ये आवश्यक सुधारणा करून ‘OBC’ साठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा.यामुळे ओबीसी समाजाची अचूक आकडेवारी उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीसाठी ठोस धोरणे आखता येतील व खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साध्य होईल.आपण या निवेदनाचा सकारात्मक विचार करून ओबीसी समाजाला न्याय द्याल, अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे.उपस्थित पदाधिकारी सौ विजयाताई घेंगारे तालुकाध्यक्ष हिंगणघाट,श्री विशाल मुटे शहराध्यक्ष हिंगणघाट श्री अतुल भाऊ तिमासे,श्री चिंतामण मेघरे,श्री शक्ती मासुरकर,आकाश घेंगारे,शेखर पोहनकर,जिवन तडस ,किशोर गिरडे,यशवंत गोल्हर,सारंग चरडे,सौ योगिता शहारकर,रितेश खोपाळ,अजय घेंगारे,राजेंद्र खेकारे इ.उपस्थित होते.