साहसिक न्यूज 24 ची बातमी प्रसिद्धी होताच चीतेगाव येथे ९ वी उर्दू वर्गाला मान्यता.अमर सय्यद यांच्या प्रयत्नांना यश…

0

औरंगाबाद,बीड़कीन -/ पैठण तालुक्यातील चितेगाव जिल्हा परिषद केंद्रीय उर्दू शाळा पहिली ते आठवीपर्यंत होती. परंतु चीतेगावातील केंद्रीय प्राथमिक उर्दू शाळा येथे मुलींची संख्या जास्त असून सुद्धा ९,१० वर्ग करीता मान्यता देण्यात येत नव्हती तरी जिल्हा परिषद संभाजीनगर मागील चार वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा मागणी पूर्ण करण्यात आलेली नव्हती ठराव अहवाल पूर्ण कागदपत्रे पैठण पंचायत समिती येथे पाठवलेले होते.आता प्रयन्त कोन्ही अधीकारी ९,१० उर्दू वर्ग सुरु करण्या करीता दखल देण्यास तयारी दर्शवीत नसे. पैठण तालुक्यातील सर्वात प्रथम उर्दू शाळा चीतेगांव येथे सुरू करण्यात आली होती.तरी आतापर्यंत नववी व दहावी वर्गाला मान्यता देण्यात आली नव्हती शालेय सचिव अमर सय्यद यांनी वारंवार पाठपुरवा करीत होते पण अधीकारी फक्त आश्वासन देत होते. वारंवार कार्यालयचा भेटी देत होते. पण मोठ्या आशेने गेल्यावर वरिष्ठांन कडून नेहमी निराशा हाती येत होती. या कारणाने त्यांनी शेवटी २४/०६/२०२४ तारखेला वरिष्ठ अधिकार्यांना लेखीपत्र देऊन २९/६/२०२४ तारखेला आत्मदहनाचा निर्णय घेतला. याची वरीष्ट अधीकार्यांनी त्वरीत दखल घेत २८/०६/२०२४ संध्यकाळी ८:०० वाजता बीड़कीन पोलिस निरीक्षक यांचा हस्ते ९ वी उर्दू वर्गाला मान्यता देत आहे असे पत्र शिक्षण विस्तार अधीकारी यानी दीले. साहसिक प्रतिनिधीने अमर सय्यद यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी संगीतले यात मोलाचा वाटा बीड़कीन पोलिस निरीक्षक श्री प्रमोद पाटिल,डि एस बी ची श्री बनगे,माजी सरपंच श्री सरपंच वाहेद भाई, श्री जावेद, श्री कदीर, श्री सय्यद अक्रम,अहमद सर, ,शेख साहब,बाबु काझी,हुसेन भाई,श्रीअरुण देविदास,श्री गणेश सोनवणे, इलियास इनामदार,फिरोज मिर्ज़ा, उमर शेख व आर टी आय कार्यकर्ते राजू भाई, शेख अर्शद यांना श्रेय दिले व संभाजीनगर जिल्हयातल्या पूर्ण सरकारी व खाजगी शाळांचा दौरा करुण विद्यार्थी व पालकांच्या समस्या जानून घेणार आहे असे सांगितले व अमर सय्यद यानी खास करुण बातमी प्रकशीत केल्यबादल साहसिक न्यूज़ दै-न्युज 24,लोकमत,दै तरुण भारत,नवसूर्य न्यूज यांचे आभार मानले.

अरक्षद शेख साहसिक news -/24 औरंगाबाद बिडकीन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!