पेरलेले बियाणे कुजले दुबार पेरणीचे संकट झाले निश्चित…

0

साहुर,आष्टी -/ तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकरी हैराण झालेला आहे सुरुवातीला एक दोन पाऊस आष्टी तालुक्यात झाले आणि हवामान खात्याने सुध्दा सांगितले की या वर्षी पाऊस सुरवाती पासुनच होणार आहे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कपाशी तूर सोयाबीन इत्यादींची पेरणी केली परंतु हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आणि शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे आठ दिवसात कोमेजून गेले त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे पेरणीसाठी होता नव्हता सर्व पैसा लावला परंतु पाऊस नसल्याने सर्व बियाणे कोमेजून गेले आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले त्यामुळे आता शेती करता बियाणे कसे आणायचे व पेरायचे कसे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे कृषी सेवा केंद्र मधून उधारीत बियाणे दिले जात नसल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे जर शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही तर अर्ध्यापेक्षा जास्त जमीन पडीत राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण शेतकऱ्या जवळ पैसा नसल्याने बी बियाण्याची तडजोड करणे शक्य नाही त्यामुळे काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शासनाच्या वतीने मदत करणे गरजेचे आहे हे विशेष.

शरद वरकड साहसिक news -/24 साहूर,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!