हिंगणघाट -/ येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात विरोधकांकडुन जनतेत संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न होत असुन हे विकास विरोधी राजकारण असल्याचा आरोप आ.समीर कुणावार यांनी पत्रकार परीषदेतुन केला.भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या नियमानुसार ४३० खाटांच्या रुग्णालयापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अंतर दहा किलोमीटर पेक्षा जास्त नसावे तसेच कमीत कमी २० एकर जागा असावी असे दिलेले आहे. परंतु भविष्यातील कॅन्सर रुग्णालय, डेंटल कॉलेज, फार्मसी कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज इत्यादी विविध वैद्यकीय शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने कमीत कमी ३० ते ४०एकर जागा असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायाच्या चमुने व जिल्हाधिकारी वर्धा यांनी वैद्यकीय महाविद्यालयाकरता उपजिल्हा रुग्णालया मागील जागेची पाहणी केली तसेच कोल्ही, जाम ,नांदगाव, धामणगाव परिसरातील केंद्र शासनाच्या वन विभागांतर्गत येणाऱ्या झुडपी जंगलांची सुद्धा पाहणी केली. केंद्र शासनाच्या झुडपी जंगलाच्या जागेच्या परवानगीच्या प्रक्रियेसाठी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागतो तसेच उपजिल्हा रुग्णालया मागील जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणी करीता व भविष्यातील विस्तारीकरणाकरिता अपुरी पडणार आहे. कारण उपजिल्हा रुग्णालयाची १६ एकर जागा ४३० खाटांच्या रुग्णालयाकरिता कामात येणार असुन त्यामागील चार खसर्यावरील २४ एकर जागेत पुरपिडीतग्रस्त २३५ कुटुंबियांना प्रत्येकी पंधराशे वर्गफुटाचे घरे बांधण्यासाठी भुखंड दिलेले असुन बर्याच जणांनी आपली घरे बांधलेली आहेत. तसेच सांस्कृतिक भवन करीता काही जागा आरक्षित आहे.फक्त पिंपळगाव रोडच्या बाजुला म्हाडा कॉट्रर ला लागुन दिड एकर अतिक्रमन वगळता ९एकर जागा उपलब्ध असुन ती क्रिडा संकुलासाठी प्रस्तावित आहे. परंतु विरोधकांकडून उपजिल्हा रुग्णालयामागे ४०ते ६० एकर जागा शिल्लक असल्याचा व याच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्यात यावी. अशी भूमिका घेत जनतेत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता वेळा येथील सहकारी साखर कारखाना घेणाऱ्या मल कन्स्ट्रक्शनने तेथील ४०एकर जागा शासकीय महाविद्यालयाकरिता दान देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्धा यांना सादर केला आहे. ही जागा हिंगणघाट पासून चार किलोमीटर अंतरावर व रुग्णालयापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. केंद्र शासन अखत्यारीत झुडपी जंगलाच्या परवानगीसाठी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागणे अपेक्षित आहे व प्रत्यक्षात हिंगणघाट शहरात आवश्यक तेवढी जागा उपलब्ध नसल्याने विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी शासकीय महाविद्यालयाच्या जागा मंजुरीच्या दृष्टीने वेळा येथील जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी प्रस्तावित केलेली आहे.केवळ वेळा येथील ही एच जागा प्रस्तावीत झालेली नसुन उपजिल्हा रुग्णालयाच्या मागच्या जागेसह काही झुडपी जंगलाच्याही जागा प्रस्तावित आहे.जागा निवड करणे हे माझ्या अधिकारात नसुन आता शासन व वैद्यकिय परीषद या बाबत योग्य निर्णय घेइल असे म्हणतांनाच जागेसंदर्भात जो निर्णय हौइल तो लवकर व्हावा हेच आपल्याला अपेक्षित आहे असेही आ.समिर कुणावार म्हणाले.तसेच हिंगणघाट शहरात जागा उपलब्ध असल्यास विरोधकांनी मला दाखवाव्या आपण स्वतः त्या जागेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करु असे म्हणतांनाच जागे बाबत आपली विरोधकांशी चर्चा सुरु असुन सर्वपक्षिय बैठक घेण्याचीही आपली तयारी असल्याचे आ.कुणावार शेवटी म्हणाले.पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, आकाश पोहाणे,भूषण पिसे, चंद्रकांत माळवे, श्याम भिमनवार, वामन चंदनखेडे,सुनील डोंगरे, विनोद विटाले,आशिष पर्वत , मुन्ना त्रिवेदी, संजय माडे,शंकर मुंजेवार , रवी उपासे आदी उपस्थित होते.