एस एम डब्लू इस्पात प्रा.ली.ची वृक्षलागवड ठरली जोमात पावसाच्या हंगामात १० हजार झाडांचे केले नियोजन…

0

देवळी -/ औद्योगिक वसाहतीतील एसएमडब्लू इस्पात प्रा ली.ऑफ बिझिनेस ची वृक्षलागवड मोहीम जोमात ठरली.यावेळी कंपनीचे सीईओ प्रतीक बिंदल,आर सोमेश,मन्नू जॉर्ज, श्याम मुंदडा,एचआर व्हॉइस प्रेसिडेंट रमेश नाथ,आशीष भट व जीतेंद्र पाल यांचे हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाला गती देण्यात आली.तसेच पावसाच्या या हंगामात एसएमडब्लू इस्पात कारखाना परिसरात दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.वृक्षारोपणाच्या या मोहिमेत कारखाना परिसराचा बराच भाग व्यापला आहे.यासाठी कारखाना प्रशासनाचे अधिकारी व शेकडो कामगार राबत आहे.एसएमडब्ल्यू चा परिसर हिरवागार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षीची वृक्षलागवड अधिक जोमाने तसेच एक संकल्प हाती घेवून केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.-यासाठी इस्पात प्रशासनाचे अधिकारी तसेच शेकडो कर्मचारी वृक्षलागवडीसाठी राबत आहे.तसेच पावसाच्या या हंगामात टप्याटप्याने दहा हजार झाडे लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!