आष्टी साहूर -/ वर्धा जिल्हातील आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळ उत्पादक शेतकरी असून संत्रा मोसंबी फळांवर अज्ञात रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असुन सर्व फळे खाली पडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे परंतु आमदार खासदार मंत्री कृषी विभाग उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आक्रोश निर्माण झाला आहे म्हणून आष्टी तालुक्यातील सर्व शेतकरी दिनांक 20 रोज मंगळवारला तहसील कार्यालय आष्टी येथे हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहीत आयोजक साहुर येथील शेतकरी प्रवीण टापरे, राजु वरकड , स्वप्नील नवरंग, नंदु नवरंग, बालुभाऊ गोहत्रे, मंगेश गोमासे , सुरेश मुंदाने, विजय गावंडे, घोटकर इत्यादी शेतकऱ्यांनी दीली शेतकऱ्यांनो चला उठा जागे व्हा साहुर सर्कल मधील धाडी, बोरगाव, वडाळा, वर्धपुर, सत्तरपुर, झाडगाव, टुमनी, दृगवाडा ,जामगाव ,माणिकवाडा, तारासावंगा, लहान आर्वी इत्यादी इत्यादी गावात संत्रा मोसंबीच्या गळतीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे परंतु आमदार खासदार मुंग गिळून बसले आहे म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण दुसऱ्याचे झेंडे हातात घेतल्या पेक्षा आपले दंडे हातात घ्या आणि 20 आगस्ट रोजी मंगळवारला तहसील कार्यालय आष्टी येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन मोर्चात सहभागी होऊन निवेदन देण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन साहुर येथील शेतकऱ्यांनी केली आहे संत्रा मोसंबी गळतीचे पंचनामे करून त्वरित शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत नाही केली तर शेतकऱ्यांच्या वतीने भव्य आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी त्यावेळी सांगितले आहे.