🔥हाच तो प्रमोद कारमोरेनिलगुडी रेती घाटावरून करत होता चोरी.🔥या कारवाईमुळे रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
सिंदी (रेल्वे) –/ नजीकच्या निलगुडी रेती घाटावरून रात्रीच्या अंधारात रेतीचा उपसा करणाऱ्या रेती चोरट्यावर पहाटे तहसीलदाराने धडक कारवाई केल्याने येथील रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. प्रमोद रामहरी कारमोरे (35) राहणार कांढळी व सिद्धार्थ वामन शंभरकर (40) अशी रेती चोरट्यांनी नावे आहेत.याप्रकरणी सिंदी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
तहसीलदार विलास नरवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार नजीकच्या वना नदी पत्रातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती माफियांनी निलगुडी, बरबडी, वाकसुर, चाकूर, पारडी, हत्तीगोटा आदी घाटांवरून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने बुधवारी दिनांक 28 ऑगस्टच्या रात्री सिंदी-कांढळी रस्त्याने गस्त लावत असताना पहाटे 4 वाजताच्या सुमारास सिंदी शिवारात एच.पि. गॅस गोदामाजवळ कांढळी कडून सिंदीकडे वाळूने भरलेला लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा नवीन नंबर नसलेला ट्रॅक्टर येत होता. दरम्यान, ट्रॅक्टर थांबवून वाहनचालक वामन सिद्धार्थ शंभरकर यास तहसीलदार नरवटे यांनी वाळूच्या परवाना बाबत विचारणा केली असता त्याने गोलमाल उत्तर दिले. दरम्यान, ट्रॅक्टर प्रमोद रामहरी कारमोरे राहणार कांढळी तालुका सेलू जिल्हा वर्धा यांच्या मालकीचा असल्याचे त्याने सांगितले. यावेळी ट्रॅक्टरमध्ये दीड ब्रास वाळू असल्याने तहसीलदार नरवटे यांनी सदर ट्रॅक्टर ताब्यात घेत सिंदी पोलीस ठाण्यात जमा केला असून याप्रकरणी पुढील तपास सिंदी पोलीस करीत आहे. नवनियुक्त तहसीलदार विलास नरवटे यांच्या या धडक कारवाईमुळे येथील रेती माफियांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.🔥सिंदी पोलिसांचे रेती माफियांसोबत हितसंबंध🔥 अलीकडे रेती व्यवसायाला सोन्याचे दिवस आले आहे.त्यामुळे रेती माफियांनी आपला मोर्चा नजीकच्या निलगुडी, वाकसुर, बरबडी, चाकूर, पारडी,हत्तीगोटा आदी घाटांवर आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, महसूल बुडवून अनेक रेती माफिया रात्रीच्या अंधारात अवैधरित्या वाळूचा उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करीत आहे.मात्र, सिंदी पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून रेती माफियांशी आपले हितसंबंध जोपासत आहे. याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांना मुखबिरकडून फोनवरून गोपनीय माहिती देऊन सुद्धा मी ठाण्यात नाही बाहेर आहो, असे सांगत करवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याकडे पोलीस विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.