BREAKING: एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदाराला जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्राने खळबळ
Byसाहसिक न्युज 24
ठाणे :जिल्ह्यातील अंबरनाथ मतदार संघाचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना ठार मारण्याची धमकी देणारं निनावी पत्र आलं आहे. किणीकर यांच्या अंबरनाथमधील कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने आज हे पत्र आलंय. या पत्रा मुळे अंबरनाथ मधील राजकीय वातावरण तापलंय.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे देखील शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी सोबत गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे किणीकर यांच्या घराला पोलिसा सुरक्षा देण्यात आली आहे , किणीकर राहत असलेल्या निसर्ग ग्रीन या गृहसंकुलातील त्यांच्या घराला गेल्या दहा दिवसांपासून पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे.
मात्र आज अंबरनाथमध्ये आमदार बालाजी किणीकर यांना अज्ञात इसमाने एक पत्र पाठवत गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत किणीकर यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केलाय. या पत्रामुळे अंबरनाथ शहरात खळबळ माजली आहे. कालच एक नाथ शिंदे यांच्या समर्थकांनी अंबरनाथ येथील शिवाजी चौकात एकत्र येत घोषणा बाजी केली होती.
पत्रातील मजकूर काय आहे?
“आमदार बालाजी तेरेको गोली मारनेका दिन आ गया हे. हमारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है इसिलिए तुझे मारनेका है. बता इसलिये रहा हुं, जब में मारूंगा वह दिन तय है, तब तक टू रोज डर डर के जिये’
हे पत्र कोणी पाठवलं याचा आता पोलीस तपास करत आहेत.