Devendra Fadnavis PC : देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत कोणता गौप्यस्फोट करणार? तर्क-वितर्कांना उधाण!
गेल्या महिन्याभरापासून मुंबईत एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आता शिगेला पोहोचला आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी एकमेकांविरोधात आरोप केले आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडणार आणि कोणता मोठा गौप्यस्फोट करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मी घोषणा केली होती की काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला. कारण कागद गोळा करत होतो, काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते.
मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे.
सरदार शहावली खान हे १९९३ चे गुन्हेगार आहेत. यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून ते तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाले. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरलं. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली.