Jalgaon Live Impact : जळगाव ग्रामीणमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर छापे, ८०० लीटर रसायन फेकले
Byसाहसिक न्यूज24
मुक्ताईनगर/ पंकज तायडे:
धरणगाव शहरात बिनधास्तपणे सट्टा, जुगार सुरू असल्याचे आणि जळगाव ग्रामीण परिसरात अवैध दारू विक्री व जुगार सुरू असल्याचे वृत्त ‘जळगाव साहसिक न्यूज24’ने प्रसिद्ध केले होते. पोलिसांनी वृत्ताची दखल घेत धरणगावला कारवाई केल्यानंतर जळगाव ग्रामीणमध्ये देखील सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांनी ८०० लीटर कच्चे रसायन नष्ट केले तर दोन ठिकाणी कारवाई केली.
यावेळी उपनिरीक्षक कुमार चिंथा यांच्या आदेशान्वये पथक SDPO कार्यालय जळगाव येथील PSI सुनील पाटील, रवींद्र मोतीराया, महेश महाले, सुहास पाटील, अनिल फेगडे, रामकृष्ण इंगळे यांनी कानळदा येथे गिरणा नदीकाठी आरोपी मनोज रमेश सपकाळे याच्यासह 800 लिटर कच्च रसायन व 35 लिटर गाहब दारू व मुद्देमाल सह एकूण रक्कम रुपये 19750/- जप्त केली. याच बरोबर जळगाव येथील PSI सुनील पाटील, रवींद्र मोतीराया, महेश महाले, सुहास पाटील तसेच राज्य उत्पादन शुल्क येथील पीएसआय सोमनाथ शेलार व राहुल सोनवणे यांनी कानळदा येथे गिरीश शामकांत राणे यांच्या नावाने सुरू असलेली सायली बिअर शॉपी मध्ये आरोपी मच्छिंद्र काशिनाथ सपकाळे याला विनापरवानगी व बेकायदेशीरपणे टॅंगो पंच दारू विकताना सापडल्याने अटक केली. यावेळी आला एकूण 92 टॅंगो पंच 180ml चा कॉटर मुद्देमाल सह एकूण रक्कम रुपये 6440 जप्त करण्यात आली.