NDPS सेल व अँटी गॅंग सेल द्वारा वर्धा(शहर) हद्दीत कार व मोपेड सह 7,75,300/- रु. चा देशी -विदेशी व बियर दारू साठा जप्त

0

आज रोजी पोळा सणाच्या अनुषगाने वर्धा शहरात मोठ्या प्रमाणत दारू साठा येत आहे अशी मिळालेल्या माहिती वरून वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत दयाल नगर येथे नाकाबंदी केली असता नमूद कार मधील इसमानी आपले ताब्यातील वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करीत असता त्यांना नाकेबंदी करुन थांबविले असता त्याचे ताब्यातील कारची व मोपेडची तपासणी केली असता, कार व मोपेड मध्ये वरील प्रमाणे देशी – विदेशी दारूचा माल अवैधरित्या बाळगून त्याची वाहतूक करतांना मिळून आल्याने पंचासमक्ष मोक्यावरून कार सह

जु.किं. 7,75,300/- रु. चा माल जप्त केला. सदर दारुमाल आरोपी 1) कोहिनूर संजय उके, वय 24 वर्ष,
रा:- भिम नगर वर्धा
2) आयुष पुरुषोत्तम वावरे वय 20 वर्ष
रा:- बोरगाव टेकडी वर्धा
3) यश चंद्रशेखर देवगडे वय रा. समता नगर वर्धा
4) दर्शन हरिभाऊ फुंदे वय 23 वर्ष रा:- गणेश नगर वर्धा
5) मुकेश जयस्वाल रा. विठाळा बारमालक. (पसार) याचे कडून विकत घेतल्याचे आरोपी क्रमांक एक ने सांगितले वरून नमूद पाचही आरोपींविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी क्रमांक एक ते चार यांची शारीरिक तपासणी करून त्यांना अटक करुन जप्त मुद्देमालासह पोस्टे वर्धा शहर याचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस अमलदार संतोष दरगुडे गजानन लामसे राजेश तिवस्कर राकेश अष्टकर यशवंत गोल्हार गोपाल बावनकर, संघसेन कांबळे रितेश शर्मा, अक्षय राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली                                                                                         अविनाश नागदेवे
सहासिक न्यूज-24/वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!