अंगणवाडीतील 131 विद्यार्थ्यांना गणवेश वितरण राशन दुकानदार संघटनेचा स्तुत्य उपक्रम

0

🔥अंगणवाडीतील 131 विद्यार्थ्यांना गणवेश वितरण,राशन दुकानदार संघटनेचा स्तुत्य उपक्रम

सेलू – / सामाजिक बांधिलकी जपत सेलू तालुका राशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सतीश भावरकर यांच्या पुढाकारातून अंगणवाडी व प्री-प्रायमरीतील 131 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले. शहरातील विद्यादीप सभागृहात झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अमर काळे होते. यावेळी काँग्रेसचे नेते शेखर शेंडे, माजी उपनगराध्यक्ष चुडामण हांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफभाई सय्यद, तालुकाध्यक्ष रामू पवार, नगरपंचायत गटनेते शैलेंद्र दफ्तरी, नगरसेवक राजेंद्र मिश्रा, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रेणुका कोटंबकार, शिक्षण सभापती बोरीकर मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य सौरभ शेळके, गणेश खोपडे तसेच राशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सतीश भावरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी सिंदी रेल्वे नगरपरिषद हद्दीतील राजेंद्र प्राथमिक शाळा व कस्तुरबा प्राथमिक शाळेच्या प्री-प्रायमरी विभागातील 51 विद्यार्थ्यांसह कोटंबा, आमगाव व खडकी येथील अंगणवाडीतील 80 विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण करण्यात आले. नवीन गणवेश मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, तालुक्यातील राशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     सचिन धानकुटे साहसिक    News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!