पुलगाव /लिनेस क्लब तर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन दिनांक 17 ते 24 /4/24 पर्यंत आदर्श हायस्कूल पुलगांव येथे करण्यात आले. परिक्षा झाली कि मुले उन्हाळी शिबिराचे आतुरतेने वाट पाहत असतात. शिबिरा मध्ये 1ली ते 8 वी वर्गातील मुले, मुली सहभागी झालेत . मुलांचे बौद्धिक कौशल्य, प्रत्येक विद्यार्थ्यांत लपलेले सुप्त गुण, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा शिबिराचा उद्देश आहे. या मध्ये मुलांचे योगा, जुंबा, नृत्य, गायन,कागद काम, रांगोळी , स्मरण शक्ती खेळ, हे सगळं त्यांना शिबिरामध्ये शिकवण्यात आले. तसेच मुलांना पौष्टिक आहार व शरबत पण देण्यात आले. शिबिरात येवून मुलांना खूप आनंद व मजा येत होती. या शिबिरासाठी आदर्श शाळेतील शिक्षकांनी खुप सहकार्य केले.आदर्श शाळेतील मुख्याध्यापक सर, मेश्राम सर,. जयश्री ठाकरे मॅडम, माधुरी टाक मॅडम , राजु भाऊनी खुप मदत केली व शिबिराचे आयोजन करण्यास सहकार्य केले . शेवटी मुलांना शिकवलेल्या सर्व अक्टीवीटी व स्पर्धा घेण्यात आली. व त्यातुन क्रमांक 1,2,3 काढून मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षिस देण्यात आले. मान्यवरांनी शिबिर ला येवून मुलांना शिबिरात येण्याचे महत्त्व , फायदे सांगितलें .या शिबिरासाठी यशस्वीतेकारिता पास्ट प्रेसिडेंट राजश्री जमणारे, जयश्री ठाकरे मॅडम, माधुरी टाक मॅडम, सारिका पाबले , कांचन भोयर, चैताली काळे, किरण गुलालकर, सुषमा गायधने, दिपाली भोगे, शुभांगी डाकोरे मॅडम, अध्यक्ष शिल्पा जाधव,सेक्रेटरी विद्या जाधव, ट्रेझरर्र मेघा देशमुख , शुभांगी गाढवे, राजु भाऊ गाढवे यांनी खूप मोलाचे योगदान दिले.