अखेर दैनिक साहसिक च्या पाठलागाने,पळसकुंड-उमर विहीर ग्रामपंचायतीच्या संरपंचाला केले पायउतार 

0

🔥अखेर दैनिक साहसिक च्या पाठलागाने,पळसकुंड-उमर विहीर ग्रामपंचायतीच्या संरपंचाला केले पायउतार 

🔥ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा वनिश घोसले व कुटे यांच्याकडे

यवतमाळ -/ पळसकुंड-उमर विहीर गट ग्रामपंचायतीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली असून, उपसरपंच श्री. सुभाष विठ्ठल शिंदे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ७ विरुद्ध २ अशा मोठ्या फरकाने मंजूर करण्यात आला आहे. आज गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी तहसीलदार, राळेगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निकालामुळे जवादे व शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून, ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा वनिश घोसले व कुटे यांच्याकडे आल्या आहेत.

यापूर्वी दिनांक २०/११/२०२६ रोजी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्यांनी मा. तहसीलदार, राळेगाव यांच्याकडे अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली होती. यामध्ये उपसरपंच सुभाष विठ्ठल शिंदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून बोगस दस्तऐवज तयार केले, त्याआधारे बेकायदेशीररीत्या बँक कर्ज उचलून शासन व संस्थेची फसवणूक केली आणि ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के (शासकीय मोहोर) वापरले, असे गंभीर आरोप करण्यात आले होते. या गैरप्रकारांमुळे ते पदावर राहण्यास अपात्र असल्याचे सांगत सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता.

अविश्वास ठरावाच्या नियमांनुसार (नियम १९५९, कलम ३५) आज तहसीलदार राळेगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत ठरावाच्या बाजूने खालील ७ सदस्यांनी आपले मत नोंदवून सुभाष शिंदे यांना पदावरून पायउतार केले:

१. सौ. वर्षा राजू कुटे (सदस्य)

२. श्री. रविदास दिलीप पवार (सदस्य)

३. सौ. कांताबाई हिराचंद पवार (सदस्य)

४. सौ. लीना राजू कोडापे (सदस्य)

५. सौ. पुष्पकला प्रल्हाद राऊत (सदस्य)

६. श्री. विष्णू अ. टेकाम (सदस्य)

७. श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल सीडाम (सदस्य)

७ विरुद्ध २ मतांनी हा ठराव संमत झाल्यामुळे जवादे व शिंदे गटाच्या मनसुब्यांना मोठा सुरुंग लागला आहे. या विजयानंतर वनिश घोसले व कुटे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला असून, ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आणि बोगसगिरीला थारा दिला जाणार नाही, असा ठाम इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे. तसेच, संबंधित गैरप्रकारांबद्दल दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सर्व सदस्यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!