आकोली येथे कृषि विषयक मार्गदर्शन; कृषिदुतांचा उपक्रम
Byसाहसिक न्युज 24
गजेंद्र डोंगरे/ मदणी (आमगाव):
आकोली येथील लक्ष्मीमाता मंदीर सभागृहात रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक प्रशिक्षण च्या कृषिदुताच्या पुढाकाराने प्राचार्य सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात कृषि विषयक मार्गदर्शन कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच वैशालीताई गोमासे, कार्यक्रम अधिकारी खोडके, कार्यक्रम समन्वयक डाँ काळे, प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्राध्यापक आकाश लेवाडे, व प्राध्यापक वैभव गिरी उपस्थित होते. यावेळी प्रा. आकाश लेवाडे यांनी खरीप हंगामातील एकात्मीक पिक व्यवस्थापक तर प्रा. वैभव गिरी यांनी सोयाबिन पिकाचे व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कृषिदुतानी विविध माहीती दर्शक चित्र तयार करून त्यांचे प्रदर्शनची मांडनी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाँ. काळे यांनी तर संचालन सुरभी भोंगाडे, तर आभार मुस्कान शेख यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजनास कृषिदुत पुर्वा थुल, सुरभी भोंगाडे, रूतुजा राऊत, कल्याणी ढगे, मुस्कान शेख, स्वेजल ढोले गावातील ग्रामस्थ , ग्रामपंचायत पदाधिकारी, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.