आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळी लावून कोलकत्ता घटनेच्या केला निषेध…

0

वर्धा -/ जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी 17 ऑगस्ट 2024 रोजी कामाच्या ठिकाणी काळीफित लावून कोलकत्ता येथील घटनेच्या निषेध केला ९ ऑगस्ट २०२४ च्या पहाटे कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीधर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली.यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे.यामुळे डॉक्टर्स च्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. . आर जी कार महाविद्यालतील अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची परिस्थिती अतिशय हलगर्जीपणे, निष्काळजीपणे हाताळली आणि पहिल्या दिवसानंतर तर पोलिस तपासही जाणिवपूर्वक रखडवला गेला जेणेकरून या प्रकरणातील हाय प्रोफाईल गुन्हेगार सुटतील. मात्र अखेर १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना आतापर्यंतच्या तपासावर असमाधान व्यक्त करून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपविण्यास सांगितले आहे. राज्य पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.पंधरा ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्यदिनी जेव्हा आपण सर्व देशवासी आनंद साजरा करीत होतो त्याच दिवशी मोठ्या जमावाने या रुग्णालयाच्या विविध विभागांची फक्त तोडफोडच नाही केली तर ज्या सेमिनार रुममध्ये पिडीत निवासी डॉक्टर चा निर्घृण बलात्कार व हत्या केली गेली तेथले पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या जमावाने केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवरही हल्ला केला. एवढे अपुरे होते की काय भरती असलेल्या रूग्णांना तसेच भरती रूग्णांसाठी लागणाऱ्या साधनसामग्री ला सुध्दा प्रचंड मोठी क्षती पोहोचविली.डॉक्टर्स विशेषत: स्त्री डॉक्टर्स हिंसाचाराला वारंवार बळी पडतात. रुग्णालये आणि कॅम्पसमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेची तरतूद करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र डॉक्टर्स च्या सुरक्षेबाबत संबंधित ह्या अधिकाऱ्यांच्या उदासीनता आणि असंवेदनशीलतेमुळेच डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार शारीरिक हल्ले होतात, रूग्णालयामध्ये राडे होत राहतात.कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील स्री निवासी डॉक्टर वर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समाज कृती समिती आयटक सलग्न कंत्राटी नर्सिंग यांच्या आव्हानानुसार वर्धा जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून निषेध करीत झालेल्या घटनेचा सखोल तपास करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली संघटनेचे राज्य अध्यक्ष काँ.दिलीप उटाणे मुख्य सल्लागार सिद्धार्थ तेलतुंबडे बाबाराव कनेर शरद डांगरे वंदना उईके विकास माणिककुडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!