राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध तिनं चाकी, चार चाकी वाहणाचे अतिक्रमण,,आर्वी ची पुनराऊट्टी होणार काय.
आष्टी शहीद /आष्टी हें तालुक्यातील ठिकाण असून यां शहराची ओळख शहीद विराची भूमी म्हणून ओळख आहे. यां शहरातून मध्य प्रदेश राज्यात जाणारा राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाला. यां मार्गांवर रोज अनगीनात वाहने भरधावं वेगात बस स्टॅन्ड परिसरात येतात आणि जातात ही. आणि याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करण्यात येत आहे. अतिक्रमण वाढीस दिवसेंदिवस चालना मिळत आहॆ.
सविस्तर असें कि,
आष्टी यां शहरात हिंदू मुस्लिम हा समाज असून यां गावात येकोपा आहॆ. राष्ट्रीय सन ही मोठया उत्साहात साजरा केला जातो. यां गावात जातीय दंगल झाल्याचे कुणी सांगत नाही. याच शहरातून मध्य प्रदेश कडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाला. आष्टी शहराच्या बस स्टॅन्ड भागात वाहणाला पार्किंग ची जागा उपलब्ध नसल्याने प्रवासी वाहने ऑटो, कार, ट्रक ही रस्त्यावर लावली जातात आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. रस्ता उंच झाल्यावर खोलगट भागातील दुकान मालकांनी आपली दुकानें रस्त्यावर उभी करून अतिक्रमण केलें आहॆ. यावर आष्टी नगरपंचायत नें कोणतीही उपाय योजना केली नाही. बस स्टॅन्ड भागात रस्त्यावर मधोमध वाहने उभी करून पार्किंग स्तळं निर्माण करण्यात आले आहॆ. अतिक्रमण केलेल्या वाहणावर आता पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आटो चालक व मालक यांनी वाहन उभे करण्यासाठी पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले होते यावर कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाहीं. रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण हटवावे यासाठी पोलीस प्रशासन, नगरपंचायत विभाग यांनी तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनु भार्गव यांनी केली आहॆ.
आर्वी शहरातील अपघाताची पुनराऊत्ती होऊ नये म्हणून आष्टी शहरातील अतिक्रमण हटवावे अशी मागणी जोर धरू लागली आहॆ.