हिंगणघाट करांनी आंदोलने करून हिंगणघाट शहरात मंजूर करून आणलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचें निर्माण कार्य हिंगणघाट शहरातच करा….

0

तसेच यां शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निर्माण कार्य तात्काळ सुरू करा.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

हिंगणघाट / वर्धा जिल्ह्यात मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे यासाठी म्हणून हिंगणघाट शहरात विविध आंदोलने झालीत.. हिंगणघाट शहर बंद ठेवण्यापासून ,तर मुंडन आंदोलन असो की महीला कृती समितीचे साखळी आंदोलन असो अश्या विविध आंदोलनातून हिंगणघाट शहरातील नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात खेचून आणले.. मात्र आता हिंगणघाट शहरात मंजूर झालेले हेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातील एक उद्योजक हिंगणघाट शहरातील स्थानिक मोठ्या नेत्याच्या माध्यमातून वर्धेच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.. प्रथमता या स्थानिक नेत्याने हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी म्हणून विरोध केला होता. आता शेवटी हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात मंजूर झाल्यानंतर एका मोठ्या उद्योजकाच्या माध्यमातून वर्धा रोडवर असलेल्या वेळा येथील बापुरावजी देशमुख साखर कारखान्याची जमीन विकत घेऊन या जमिनीतील काही भाग शासनाला दान देत हे मेडिकल कॉलेज वर्धेच्या दिशेने पळवण्यासाठी घात घातला जात आहे… यात या राजकीय नेत्याने व या राजकीय नेत्याच्या अवतीभवती असलेल्या धन दांडग्या व्यावसायिकांनी या साखर कारखान्या परिसरातील अनेक शेती विकत घेतली आहे.. मेडिकल कॉलेज साठी थोडीफार जमीन देऊन शेकडो एकर जमिनीचे भाव दहा पट वाढवीत करोडो रुपयांचा नफा कमवण्याचा मानस या असल्या बिल्डर नेत्याकडून व एका मोठया उद्योजका कडून केला जात आहे… यामुळे हिंगणघाट शहरातील जनतेच्या आंदोलनाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून व असल्या उद्योजक व राजकीय नेत्याच्या मनसुभ्यावर पाणी फेरण्याच्या दृष्टिकोनातून आपण कठोर पावले उचलणे महत्त्वाचे आहे.. हिंगणघाट शहरात मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व हिंगणघाट शहरा नजीक असलेल्या दोन तीन किलोमीटर परिसरात उभारण्यात यावे अशी आमची मागणी आहे. आर्थिक दृष्ट्या मोठा फायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू असलेला या बिल्डर नेत्याचा व त्याच्या सहकारी उद्योजकाचा हा प्रयत्न पूर्ण होता दिसल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घ्यावी…
हिंगणघाट शहरात मंजूर झालेले शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच निर्माण व्हावे व तात्काळ करण्यात यावे असे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तर्फे करण्यात आली..
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुशील घोडे, जिल्हा सचिव नितेश नवरखेडे,समुद्रपूर तालुका अध्यक्ष तुषार थुटे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष रवी कुटे, जिल्हा सचिव शेखर ठाकरे, तालुका उपाध्यक्ष पंकज भट्ट,ओबीसी शहराध्यक्ष अमोल भिषेकर, संचिन घोडे, शहर उपाध्यक्ष साहील चौधरी,अमित रंगारी, रवींद्र बोरकर, राकेश शेंडे, शेख नईम, नदीम अली, रवी मेसेकर,निखिल ठाकरे, राहुल बोरकर, विपुल थुल, आदित्य बूटे, गोपाळ गुळघाणे, कुणाल येसम्बरे, गौरव वानखेडे, रेहान पठाण,विपुल वाढई, भारत बावणे, वैभव भुते, रोशन निशाणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!