एन.सी.सी.’बी’ प्रमाणपत्र धारकांचा सत्कार.
स्थानिक २१ महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन अंतर्गत देवळीच्या एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.पथकातील १० छात्र सैनिकांनी ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांना एन.सी.सी. बटालियन चे सुबेदार मेजर हरी प्रसाद ग्यानी व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या शुभहस्ते प्राविण्य प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.प्राविण्य प्राप्त छात्र सैनिकांमध्ये अंडर ऑफिसर अक्षय जबडे,अंडर ऑफिसर राखी खोडे,सार्जंट प्रतिक क्षीरसागर,सार्जंट शेखर भोगेकर, सार्जंट वैष्णवी शिरभाते,कॅडेट नैना गवळी,प्रशिल अंदुरकर,अबोली नेहारे, संकेत गुजरकर व साहील रामगडे यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे सर्व छात्र सैनिक ‘बी’ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.आपल्या यशाचे श्रेय एन.सी.सी.बटालियन चे कमाडंट कर्नल समिक घोष,यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले यांना देतात.
अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा