कुऱ्हा तलावाखालील बाऱ्हा गावच्या लोकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्या- अन्यथा आंदोलन करणार गावकरी
साहसिक न्यूज24
रसुलाबाद / संदीप रघाटाटे:
कुऱ्हा तलावच्या पायथ्याशी 100 मीटर वर असलेल्या बाऱ्हा सोनेगाव येथील 40 कुटुंबातील 164 लोकांना कुऱ्हा तलावाला पावसाळ्यात धोका निर्माण झाला की ग्रामपंचायत रसुलाबाद येथे शरण घ्यावी लागते, परंतु यांना 1994 पासून खूपच मोठा धोक्याचा सामना करावा लागतो.
या कुऱ्हा तलावाला 2019 मध्ये पहिल्यांदा भेगा पडल्या होत्या. त्यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले होते, त्यात मोठ्या अधिकाऱ्यांनी भेटी ही दिल्या होत्या, परंतु नंतर सर्व थंड बस्त्यात गेले.
त्यानंतर जास्त प्रमाणात पाऊस काही झाला नाही. आत्ता जुलै 2022 ला जास्त पाऊस झाला तेव्हा या तलावाने धोक्याची पातळी क्रोस केली. आणखी तलावाला खुप मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या आणखी प्रशासन जागे झाले व पळापळ सुरू झाली.
कुऱ्हा तलाव संबंधित विभागाला काही निधी नोव्हेंबर 2021 ला मंजूर झाला आहे परंतु संबंधित प्रशासन झोपले असल्याने , भोंगळ कारभार असल्याने यावर कोणीही कार्यवाही केली नाही, कोणत्याही प्रकारची डागडुजी किंवा केल्या गेले नाही. मात्र दादाराव केचे यांनी या गावच्या पुनर्वसनसाठी विधानसभा मध्ये प्रश्न उपस्थित केला होता. परंतु त्यावर लघुसिंचन विभागाने उत्तर दिले की यांना पुनर्वसन करण्याची काहीच गरज नाही. म्हणून हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे.
बाऱ्हा सोनेगाव येथील लोकांना दरवर्षी जीव मुठीत धरून पावसाळ्यात पळापळ करावे लागते त्यामुळे सरपंच रसुलाबाद यांना घेऊन जिल्हाधिकारी वर्धा यांची भेट घेतली. जर येत्या 15 दिवसात कोणत्याही प्रकारची तात्पुरती राहायची व्यवस्था झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात येणार आहे असे बाऱ्हा सोनेगाव येथील महिलांनी यावेळी सांगितले.