कृषी दुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By साहसिक न्युज 24
गजेंद्र डोंगरे / मदनी(आमगाव):
रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय,पिपरी वर्धा येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत कृषी विषयक प्रत्यक्ष प्रात्याक्षिकाचे धडे शेतकऱ्यांना देण्यात आले.तसेच कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्याचा बांधावर पोहचण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी खडतर प्रयत्न करत आहे. हे मार्गदर्शन कृषी दुत सम्यक गोटे, निवास बुधवत , वैभव वानखेडे, संकेत झोड , यशवंत शिंदे, सिद्धेश उंबरकर, पंकज तडस यांनी मदना गावातील शेतकऱ्यांना शेती संदर्भात मार्गदर्शन तसेच प्रत्याक्षिकाचे आयोजन केले व शेतकऱ्यांना बिजांची उगवण क्षमता वाढवणे तसेच जमिनीतील किडींचा, बुरशीचा बियाण्यावर होणारा दुष्परिणाम व त्यावर उपाययोजना, जमिनीची पूर्व मशागत आणि बीज प्रक्रिया याबाबत माहिती सांगितली .यासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बी. के. सोनटक्के , कार्यक्रम अधिकारी पी. एस. खोडके , कार्यक्रम समन्वयक डॉ राणी काळे आणि वैभव गिरी व महाविद्यालयाचे इतर सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास कृषीदुतांनी परिश्रम घेतले.