गंगापूर गावाला केअर इन्डिया टिमची भेट!
सागर झोरे / देवळी :
तालुक्यातील आंजी (बऱ्हाणपूर) गट ग्रामपंचायत असलेल्या गंगापूर येथील गावात कृञीम पाणीटंचाई निर्माण झाल्याने येथील गावातील नागरिकांना पिण्याचे पाणि सुरळीत मिळत नव्हते. वारंवार ग्रामपंचायतकडे पाठपुराव्यामुळे महिलांना पाणि मिळू लागले.
महिलांनी स्वतःची समस्या स्वःतहून सोडविल्यामुळे केअर इन्डीया कडून महिलांचे मत जाणून घेण्यासाठी गावपातळीवरील महिलांशी हितगुज करण्यासाठी २४ डिसेंबर रोजी गंगापूर गावाला इंदोर येथील शरद केसलीया मुख्य कार्यक्रम अधिकारी व वर्धा येथील ऑपरेशन मॅनेजर रविकांत घाटोळ यांनी भेट दिली.
या भेटीमध्ये महिलांशी चर्चा करून समस्या तुमची सोडवायची तुम्ही माञ आमचे प्रशिक्षक मार्ग दाखवतील याबाबत महिलांनी पुढाकार घेऊन गावाची समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक विचार करून समस्येचे निराकरण करण्या बाबत चर्चा करण्यात आली.
महिलांनी पाण्याची अडचण कशी सोडविली हे जाणून घेतले.
गंगापूर येथील केअर इन्डीया महिलांनी पुढाकार घेऊन याचे कारणे शोधून थेट ग्रामपंचायत मधे जावून सरपंच ग्रामसेवक यांची भेट घेतली. व कायमस्वरूपी तोडगा काढण्या संदर्भात चर्चा केली. यामधे केअर इन्डीया गृपच्या महीला , ग्रामसेवक अल्का ताल्हन, सरपंच विलास देवडे, सहभागी होऊन गंगापूर गावाला रोज शुद्ध पाण्याचा पुरवठा कसा करता येईल याकडे लक्ष वेधून आलेल्या विद्युत तांञीक अडचणीची समस्या सोडवून पाणि मिळण्या करीता ग्रामपंचायतीने सहकार्य केले.
यापूर्वी या गावाला शुद्ध रोज पाणि मिळण्यात यावे याकरीता केअर इन्डीया च्या महिलागटानी ग्रामपंचायत ला निवेदन दिले होते.
पाणी का मिळत नाही ही बाब तपासून गंगापूर येथील केअर इन्डीया च्या महिलांना या संदर्भात येत असलेली अडचण ग्रामसेवक व सरपंच यांनी समजावून सांगितली.
गंगापूर येथे पाणिपुरवठा करण्याकरिता स्वतंत्र पाण्याची टाकी उभारणे हाच एकमेव पर्याय असल्याचे या टीमला सांगण्यात आले.
केअर च्या प्रशिक्षणातून महिलांनी जो प्रयत्न केला त्याबद्दल केअरच्या टिमने समाधान व्यक्त केले.
यावेळी गावातील सरपंच विलास देवडे, तालुका समन्वयक योगेश ढोक, प्रशिक्षक योगेश काबंळे व महिला उपस्थित होत्या.