गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील कलावंतांचा गुजरात राज्यामध्ये डंका..
गणेशोत्सवानिमित्त युवा स्टेशनरीतर्फे युवा माय बाप्पा गणेश महोत्सव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ते गुजरात राज्यातील सुरत या गावातील मधील ९ नामांकित आंतरराष्ट्रीय स्तरांवरील शाळांमध्ये या गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ललित कला विषयात विविध प्रकारचे गणपती रेखाटन व रंगकाम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. ही कार्यशाळा २५, २६ आणि २७ तारखेला सुरत येथे तीन दिवसांत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत कला गौरवने सन्मानित व शुभम आर्टच्या संचालिका माधुरी सुदा (अमरावती ),श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती संचालक प्राध्यापक सारंग नागठाणे (अमरावती ),सौ. वंदना काळे( नागपुर ) यांच्या कु.प्रगती सुदा( अमरावती ), सौ.ज्योस्ना हंसोरीया (नागपुर ) कु.मुक्ता वाघ (कारंजा लाड) चि.जय विजय ठाकरे( अमरावती )चि.इशान काथवटे ( अमरावती )मार्गदर्शनाखाली झाली व सोबतच यांनीही सहभाग घेतला. महाराष्ट्रतील या सहा कलाकारांनी ५००० विद्यार्थीना ललित कलांची माहिती दिली. या कार्यशाळेत इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गेल्या आठवड्यात गणपती पूजनाच्या निमित्ताने नागपुरात या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. तेथे पण ४०००विद्यार्थीनी सहभाग घेतला होता विल इंडिया चेंज फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.यामध्ये सुरतच्या
योगी प्रवृत्ती आणि अक्षर ज्योती हायस्कूल ( कातरगाम ) ,समिती इंग्लिश मीडियम स्कूल ( उधना ),गजेरा विद्याभवन (कटरगाम ),मौनी इंटरनॅशनल स्कूल ( उत्तरन ),क्रिप्टन इंटरनॅशनल स्कूल( वेलंजा अब्रामा रोड),पी.पी. सावनी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल ,अग्रवाल विद्या विहार (वेसु ),एस.डी. जैन मॉडर्न स्कूल डेस्टिनेशन ( वेसू ),एल.पी सावनी विद्याभवन डेस्टिनेशन ( अडाजन ) या सर्व गुजरातच्या मुख्या ९ शाळा आहे या कार्यशाळेवेळी युवा स्टेशनरीच्या वतीने गजेंद्र सोळंकी, अमर कुलकर्णी उपस्थित होते. युवा स्टेशनरी हा नवनीत एज्युकेशनचा स्वतःचा ब्रँड आहे आणि विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी उत्पादने तयार करतो. या तीन दिवसीय कार्यशाळेत ललित कलेच्या क्षेत्रात अनेक आंतरराष्ट्रीय यश संपादन केलेल्या वंडर किड अनन्या पिशारोडी हिने सहभाग घेतला होता विद्यार्थाना आपले अनुभवही सांगितले अशा या कार्यशाळेचा संपूर्ण गुजरात मध्ये चर्चा सुरू आहे व युवा व नवनीत एज्युकेशन घ्या सर्व अधिकारीनी या कार्यक्रमाला खुप शुभेच्छा दिल्या अशा कार्यशाळा परत राबवु व सर्व सहा कलाकारांचा सत्कार केला महाराष्ट्रासाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे जे आपण दुसर्या राज्यात जाऊन आपली कला दाखवतो व त्याला मान सन्मान मिळतो हे खुप महत्वाचं असं मत प्रा.सारंग सरांनी केले व सर्वांचे आभार मानले
सारंग नागठाणे सहासिक न्यूज -24अमरावती