गर्भवती महिलेला प्रसूतीच्या कळा : मार्गात कंबरभर पाणी, स्ट्रेचरने ओलांडला पूर

0

साहसिक न्युज24:
विषेश प्रतिनिधी:
एकीकडे मुसळधार पाऊस सुरु असताना चंद्रपूर पासून १५ की.मी. अंतरावर असलेल्या वरवट येथील शुभांगी राहुल लोनबले या गर्भावती महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्यात. रुग्णालयात नेणे फार गरजेचे होते. मात्र बाहेर मुसळधार पाऊस, नाल्याना पूर आलेला. अश्या स्थितीत गावकरी धावून आलेत. गर्भावती महिलेला स्ट्रेचरचा मदतीने पूर पार करून दिला. वेळेवर उपचार झालेत. महिलेला बाळ झालं. मात्र घर ते रुग्णालयाचा प्रवास कुटुंबियांचा कायम स्मरणात राहणारा ठरला.
चंद्रपूर शहरात मंगळवारला झालेल्या पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडली होती. अवघ्या चार तासात २४० मिली लिटर पाऊस बरसला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले. शेकडो घरात पाणी शिरले. जिल्हातील इत्तर भागातही पावसाने कहर केला. लहान-मोठे नाले दुथली भरून वाहू लागले होते. काही पूल पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या पुराचा फटका एका गर्भावती महिलेला बसला. मात्र गावकरी धावून आल्याने ती सुखरूप रुग्णालयात पोहचली.
चंद्रपूर तालुक्यातील वरवट येथील शुभांगी राहुल लोनबोले या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. रुग्णालयात नेणे गरजेचे होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरु असताना कुटुंबियांनी आटोने तीला घेऊन चंद्रपूरकडे निघाले. मात्र मसाळा व सिनाळा मार्गांवरील नाल्याला पूर आला होता. पुलावरून पाणी वाहत होते. पुलावरून आटोने जाणे शक्य नव्हते. काही गावकरी धावून आलेत. ग्रा.पं सदस्य विनोद मुनघाटे यांनी सिनाळा गावचे माजी सरपंच बंडू रायपुरे यांना भ्रमणध्वनीने माहिती दिली. रायपुरे आणि त्यांचे सहकारी रुग्णावाहीकासह पोहोचले. रुग्णावाहीक पुलाचा दुसऱ्या बाजूने होती. रुग्णावाहीकेतील स्ट्रेचर सोबत घेऊन त्यांनी पूर ओलांडला. त्याच स्ट्रेचरच्या मदतीने गर्भवती महिलेला रुग्णावाहीके पर्यंत आणले. रुग्णावाहीका वेळेवर रुग्णालयात पोहचली. महिलेने बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!