चामला गावात भीषण पाणी टंचाई….

0

दोन किलोमीटर अंतर पार करून डोक्यावर गुंड घेऊन आणावे लागते पाणी.

टँकर नें पाणीपुरवठा करा माजी जिल्हा परिषद सदस्य छाया घोडीले यांची मागणी.

आष्टी शहीद / तालुक्यातील माळ रानात वसलेले चामला हे गावं असून यां गावं तील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरु आहॆ.हर घर जल ही योजना यां भागात अदयापही पूर्ण झाली नाही.पिण्याच्या पाण्यासाठी आता रानोमाळ भटकण्याची वेळ यां गावातील नागरिकांवर आली आहॆ.सविस्तर असें कि,चामला हें गावं थार ग्रामपंचायत च्या हद्दीत येत असून यां गावाकरिता पिण्याचे पाणी मिळावे म्हणून कारंजा (घा.)तालुक्यातील जसापूर तलावातून तात्पुरती व्यवस्या करण्यात आली. कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात पाणी पुरवठा विभाग अपयशी ठरला आहॆ. तलावातून पाणी सोडल्यावर ते पाणी सारवाडी, बांबरडा, व बोरखेडी व चार दिवसाने चामला गावात पोहचते. यां चार दिवसात पाईप लाईन फुटली तर किव्हा विधुत लाईन मध्ये तांत्रिक बिघाड, लोड शेडींग आदी कारण निर्माण झाल्यावर चामला गावात आठ ते दहा दिवस पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. मग यां गावातील नागरिक पाण्याच्या शोधात शेत शिवारातील विहिरी हुडकून काढतात. पुरुष मंडळी कामावर गेल्यावर घरी असलेली लहान मुळे डोकयावर गुंड घेऊन दोन किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणतात. असें भीषण वास्तव यां चामला गावात आहॆ. पिण्याच्या पाण्यासाह जाणवरांना पाणी मिळणे दुर्लभ झाले आहॆ. माजी जिल्हा परिषद सदस्य छाया घोडीले यांनी चामला गावाकरिता आष्टी येथील कापीलेश्वर तलावातून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केलें मात्र त्यांना यश आले नाही. प्रशासनाने ही योजना मंजूर केल्यास पाणी प्रश्न कायमचा संपेल अशी आशा आहॆ.ग्रामपंचायत सदस्य मधुकर मोकद्दम, सौं. बहिरट यां दोन जणांनी टँकर नें चामला गावाकरिता पाणी पुरवठा व्हावा म्हणून सतत पाठपुरावा सुरु केला आहॆ.

         🔥नरेश भार्गव🔥               साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!