🔥पुणे येथील रामा फर्टी केम डीएपी खते विकायची असेल तर राजेंद्र माळोदे याला केंद्र संचालकाकडून पाहिजे कोट्यावधी रुपये 🔥कोट्यावधीची अवैध माया राजेंद्र माळोदे च्या हाताखाली हाच तो मांजर(कल्याण एस पाटील)शॅम्पल घेण्याची धमकी देत वसूली करतो कोट्यावधीची रक्कम.
🔥 दुकानदारांनी राजेंज्याद्र माळोदे याला पैसे देण्यास नकार दिला तर त्या दुकानावर कारवाई करण्याची धमकी.
🔥आर्णी येथील कृषी केंद्र संचालकाने राजेंद्र माळोदे या लाचखोराला ‘लाच’ न दिल्यामुळे दुकानाला लावले सिल.
🔥गुण नियंत्रण अधिकारी कल्याण पाटील व राजेंद्र माळोदे या दोघा भामट्यानी कृषी संचालकांना धमकी देत कमविले कोट्यावधी रुपये.
यवतमाळ -/ च्या स्थानिक एल.आय.सी.चौक येथे कार्यरत जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात कार्यरत जिल्हा कृषी विकास अधिक्षक राजेंद्र माळोदे व त्याचा सहकारी कल्याण पाटील या दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालूक्यातील हजारो कृषी सेवा केंद्र संचालकाकडून लाखो रुपयाची लाच घेवून राजेंद्र ‘माळोदे’ याने हैद्राबाद येथे कोट्यावधी रुपयाची अवैध माया जमविली आहे.तर गुण नियंत्रण अधिकारी कल्याण पाटील हा शॅम्पल तपासणीचे नावाखाली कृषी केंद्र संचालकाना ब्लॅकमेल करीत असल्याच्या तक्रारी दैनिक साहसिकला प्राप्त झाल्या आहे.रामा फर्टी केम पुणे येथील कंपनीचा डीएपी, (१०,२६,२६)खत विक्रीचा व्यवसाय आहे.ही खते जर कृषी केंद्र चालीकांनी शेतकर्यांना विकायची असेल तर प्रत्येक दुकानदारांकडून ठराविक रक्कमेची लाच घेतल्या जातात.जो कृषी संचालक पैसे देणार नाही त्या दुकानदारा विरोधात एफ.आय.आर. दाखल करुन कोर्ट कारवाई करण्याची धमकी दिल्या जाते.ऐवढ्या धमकीने कृषी सेवा दुकानदार (मालक) घाबरला नाही तर कृषी सेवा केंद्र सिल करण्याची धमकी दिल्या जात आहे. आर्णी येथील शुभम संजय नाईक या कृषी संचालकाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे या दुकानदारावर राजेंद्र माळोदे याने कोर्ट कारवाई करुन दुकान सिल करण्याची धमकी देवून दुकान बंद करण्यात आले.तसेच नेर येथील सागर वामनराव मांगुळकर मे. सागर कृषी सेवा केंद्र बसस्थानक मेन रोड नेर यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी कल्याण एस पाटील हा आपले स्वत:चे स्विफ्ट गाडीने जिल्ह्यात वसुली करीता फिरतो या गाडीचा नंबर सुद्धा अपूर्ण आहे.तर राजेंद्र पडोळे याने दुसर्याच्या नावावर गाडी खरेदी केली सदर गाडी तेलंगणा पासिंगची असून या गाडीने राजेंद्र माळोदे अवैध वसुली करीत आहे.राजेंद्र माळोदे या अधिकार्याचा पगार लाखाच्या आत असताना याने हैद्राबाद येथे कोट्यावधी रुपयाची अवैध संपत्ती जमा केली आहे. राजेंद्र माळोदे हा सध्या यवतमाळला नोकरी करतो आणी हैद्राबाद येथे आहे.याला एक मुलगा असून मुंबई च्या कंपनीमध्ये नोकरी करतो तर त्यांच्या धर्मपत्नी हैद्राबाद येथे खाजगी कंपनीत नोकरी करते.राजेंद्र माळोदे याच्याकडे असलेली गाडी ही नरेंद्र पंजाब राऊत रां.९०१ ब्लॉक / बी फिर्चून हाईट मदीनागुदा आर आर जिल्हा रंगा रेड्डी श्रीलिंगापल्ली यांच्या नावावर खरेदी केली आहे.राजेंद्र माळोदे याचे हैद्राबाद येथे ४ स्पा मसाज सेंटर असून या ठिकाणी चांगल्या चांगल्या व्यक्तीची राजेंद्र माळोदे ‘मसाज’ करुन देतो.
हैद्राबाद येथे स्वत:चे मालकीचे ‘तनिष्क शोरुम’ उघडले आहे. यवतमाळ एम.आय.डी.सी. मध्ये कोट्यावधी रुपयाची जागा राजेंद्र माळोदे याने खरेदी केली आहे. राजेंद्र माळोदे या लाचखोराचे सासुरवाडी अमरावती जिल्ह्यातील असल्यामुळे या सर्वांना हैद्राबाद येथे घेवून गेला. या ठिकाणी साळा (मेहुणा) याचे पुनरर्वसन करण्यासाठी हैद्राबाद एम.आय.डी.सी.ला कोट्यावधी रुपयाची जमीन घेवून पैशाची लागत लावली आहे. अशा लाचखोर अधिकार्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी चौकशी करतील का? असा प्रश्न यवतमाळ जिह्यातील कृषी संचालक यांना पडला आहे. (क्रमश:)