जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोची येथे शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला लावले टाळे.
शेतकऱ्याच्या व गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवण्याच्या सरकारचा डाव – अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शाळेची पाहणी करून शाळेला तात्काळ शिक्षक देण्याची केली मागणी.
पुढील तीन दिवसात शिक्षक न मिळाल्यास गावकरी करणार धरणे आंदोलन..
हिंगणघाट : पोहना केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोची येथे शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला चक्क टाळे लावले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शाळेला भेट देऊन तात्काळ शिक्षक मिळण्याची मागणी केली आहे…
बहोतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शेतकरी व शेतमजूर वर्गातील पालकांचे विद्यार्थी शिक्षण घेतात.सरकारकडून गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षनापासून वंचीत ठेवण्याचा डाव आखला जात आहे. धोची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकच शिक्षक असून पाच वर्ग आहे. मुख्याध्यापकाचा प्रभार, माहित्या, प्रकल्प, online कामे, सर्वेक्षने ही सर्व कामे त्या एकाच शिक्षकावर असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणावर दुर्लक्ष झाले आहे.गावकऱ्याची मागील तीन महिण्यापासून शिक्षक देण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे सपसेल दुर्लक्ष आहे. गावकऱ्यांनी प्रशासनावर रोषव्यक्त करत शाळेला टाळे ठोकले आहे. यामुळे आता पुढील तीन दिवसांच्या आत शाळेत शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी गावकऱ्यांन सोबत आमची देखील मागणी आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतूल वांदिले यांनी सांगितले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांच्या सह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य ओंमकार मानकर,माजी सरपंच प्रकाश बावणे, सरपंच नितु डंभारे, उपसरपंच मोतीराम देवाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रुपाली नरुले, गजानन कौसर, वंदना नैताम, माधुरी नेवाडे,दिपाली डंभारे, निलेश इंगळे, प्रशांत दाते, मनोहर बावणे, श्रावण डंभारे, सुवर्णा डंभारे, विरेंद्र बावणे, सुनील साठे, नरेश भोयर, अतुल कोल्हे आदी गावकरी उपस्थित होते.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24