जी.प.उच्च प्राथमिक शाळा साटोडा येथे ताना पोळा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करून पोळा उत्साहात साजरा
भारत हा कृषिप्रधान देश आहे या सणाचे महत्व म्हणजे शेतकरी हा अन्नदाता जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आहे.तसेच श्रावण मास संपल्यावर हिंदू धर्मात पोळा हा बैलाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशातच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जि प उच्चप्राथमीक उच्च शाळा येथे तानापोळ्याचे व वेशभूषा कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक रवींद्र पावडे यांनी केले यात वर्ग १ ते ७ चे विद्यार्थी सहभागी झाले होते आकर्षक नंदी सजावट व वेशभूषा करून विद्यार्थी आपले नंदीबैल घेऊन आले होते.तसेच सजावट व वेशभूषा स्पर्धा विजेत्यांना ३-३पुरस्कार व २-२ प्रो्हात्सान पर पुरस्कार विद्यार्थांना वित्तरीत करण्यात आले बक्षीस प्रमाणे शैक्षणिक साहित्य सुद्धा विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशा वाजवीला शिक्षकांसह विद्यार्थ्यांणी नूत्य सादर केले शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे नृत्य पाहण्याकरिता ग्रामस्थांनी शाळेच्या प्रांगणात गर्दी केली होती.तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ही करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रवींद्र पावडे,अर्चना हजारे,मंजिरी डुकरे, संगीता उईके,नितेश झाडे,जयवंत नेवारे,व विद्यार्थ्यांनी सह सहकार्य केले
सागर झोरे सहासिक न्यूज-24