जी.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर भक्कम आरोप! माहिती लपवल्याप्रकरणी दुसरे अपील दाखल….

0

🔥जी.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर भक्कम आरोप! माहिती लपवल्याप्रकरणी दुसरे अपील दाखल.

🔥हिंगणा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकूलकर यांनी राज्य माहिती आयुक्त, नागपूर खंडपीठात तातडीने कारवाई करण्यासाठी दुसरे अपील दाखल केले

नागपूर -/ नागपूर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकूलकर यांनी राज्य माहिती आयुक्त, नागपूर खंडपीठात दुसरे अपील दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत.

माहिती अधिकार कायद्यानुसार १० दिवसांत शुल्कपत्र आणि ३० दिवसांत माहिती देणे बंधनकारक असताना, जन माहिती अधिकारी यांनी नियम तोडले. अपीलकर्त्याला शुल्कपत्र ३० दिवसांनी प्राप्त झाले, आणि सुधारित शुल्कपत्र देखील उशिरा मिळाले. यामुळे अधिकारी यांच्या कर्तव्यांत गंभीर त्रुटी दिसून येतात, ज्यामुळे भ्रष्टाचाराचे संकेत स्पष्ट होतात.

दिनांक ३०/०६/२०२५ रोजी प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील केल्यानंतरही, दिनांक १२/०९/२०२५ रोजी माहिती घेतल्यावर फक्त १३९ पानांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली, तर उर्वरित १३६१ पानांची माहिती अद्यापही लपवण्यात आली आहे. हे प्रकरण वॉटर फिल्टर व ग्रामीण R.O. प्रकल्पांशी संबंधित असून, कोट्यवधी रुपयांच्या कामांची तपशीलवार माहिती मागविण्यात आली होती.

अपीलकर्त्याने तातडीने संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याची, जन माहिती अधिकाऱ्यावर माहिती अधिकार कायद्याच्या कलम २० नुसार दंडात्मक कारवाई करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ढाकूलकर यांनी सांगितले की, “जन माहिती अधिकारी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून माहिती लपवत आहेत, त्यामुळे माझ्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. हे प्रकरण त्वरित दखल घेऊन सुनावणी करून न्याय मिळवणे अत्यावश्यक आहे.”

राज्य माहिती आयोगाने या गंभीर तक्रारीची तातडीने दखल घेऊन सुनावणी करावी, ही अपीलकर्त्याची जोरदार मागणी आहे.

गजानन ढाकूळकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!