🔥सिंचणासाठी पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.🔥
🔥दरवर्षी स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे.येणाऱ्या काळात पडणार गावे ओसाड🔥
वर्धा /जिल्ह्याच्या आष्टि तालुक्याच्या पूर्वेस उंच भूभागावर वसलेल्या चार ग्रामपंचायत मधील नऊ गावे त्यामध्ये थार, चामला, किन्ही, बामरड़ा, बोरखेडी, बोटोना, मोइ, मुबारकपूर व ठेकाकोल्हा या गावांचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे 5630 हेक्टर असून त्यापैकी 4567 हेक्टर जमिनीवर शेती केल्या जाते. या गावांची एकूण लोकसंख्या ही 10 हजाराच्या वर आहे. या गावात दर वर्षी मार्च एप्रिल आला कि सोबत दुष्काळ घेऊन येतो आणि सर्व चिमुकले, महिला, वृद्ध, पुरुष सर्वाना पाणी भरावे लागते. त्यांना सर्व कामे सोडून एवढ्या रखरखत्या उन्हात पाणी भरावे लागते. रात्री बे रात्री बैलगाडीने दोन ते तीन किमी. वरून पाणी आणावे लागते. जनावरांना फक्त पाणी पिण्यासाठी पाच ते सहा किमी जावे लागते. दयनीय अवस्थेत जीवन या भागातील नागरिक जीवन जगत आहे.आसपास चे गावांत राहणारी शंभर टक्के लोकसंख्या ही पूर्णता शेती व्यवसायावर अवलंबून आहे या भागातील अर्थव्यवस्था ही पूर्णता शेतीवर अवलंबून आहे याच भागातील गवळी समाज व आदिवासी समाज पशुपालन व्यवसाय करतो याभागात सर्व पाळीव प्राण्यांची संख्या (गाय, म्हैस, बकरी, बैल ) ऐकून 9 ते 10 हजार वर आहे. या भागात मजुराला काम हे फक्त शेती मध्ये मिळते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो इतर दुसरे कुठलेही काम त्यांच्याकडे नाही काम मिळाले नाही तर उपासमारीचि पाळी त्यांच्यावर येते.म्हणून त्यांना गाव व कुटुंब सोडून शहराकडे कामासाठी स्थलांतर करावे लागत आहे. या भागातील तरुण वर्ग शेती व्यवसाय करण्यास बिलकुल उत्सुक नाही. तो दैनंदिन कमी मजुरी मिळत असताना सुद्धा 100 किमी. पर्यन्त कामासाठी जात आहे शेती असून सुद्धा ती शेती काही कामाची नाही त्या शेतीतून लागलेला खर्च सुद्धा निघत नाही तर शेती का करावी असा प्रश्न ते करतात. शेती ही पूर्णता मॉन्सून वर अवलंबून असते फक्त खरिपाचे पिके या शेतीमध्ये घेऊ शकतात परंतु अलीकडच्या काळात शेतीला लागणार्या सर्व साहित्याच्या किमती अतोनात वाढलेल्या आहेत त्यामुळे खर्च वाढलेला आहे व त्यातून मिळणारे उत्पन्न हे कमी झालेल आहे तसेच निसर्गाचा लहरीपणामुळे कधी अति पावसामुळे तर कधी कमी पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. या भागात फक्त सहा महिने जुलै ते डिसेंबर शेती साठी पाणी वापरायला मिळते त्यात चार महिने पावसाळा असतो. या भागातील नद्या, नाले, विहिरी डिसेंबर जानेवारी महिन्यात कोरड्या पडतात. एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्या पासूनच सर्व नद्या नाले पूर्णतः कोरडे झाले आहे. एप्रिल महिना ते पाऊस पडत पर्यन्त जनावरांना घेऊन चाऱ्याच्या व पाण्याच्या शोधात पशुपालकांना भटकंती करावी लागते आपले गाव व कुटुंब सोडून तीन ते चार महिने बाहेर काढावे लागते. या भागातील नागरिकांची सामाजिक स्थिती, शैक्षणिक स्थिती, आर्थिक स्थिती तसेच जीवनमान पूर्णता ढासळलेले आहे.लोक आपली व कुटुंबातील सदस्याच्या आवश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही पुढील आयुष्य जगावे कसे हा त्यांच्यापुढे मोठा व न सुटणारा गंभीर प्रश्न उभा आहे. शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे शिक्षण, लग्न, आरोग्य सुविधा या बद्दल पालक वर्ग पूर्णता चिंतेत आहे तो कुटुंबाच्या आवश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही. या भागात शेतीसाठी लागणार्या आवश्यक सुविधा आजही उपलब्ध नाही. शेती सिंचनासाठी पाणी नाही, गावांना जोडणारा रस्ता नाही, तालुक्याला जोडणारा रस्त्याची दयनीय अवस्था आहे, विद्यार्थ्यांना बस सुविधा वेळेवर नाही, पिण्यासाठी स्वच्छ पानी नाही, शेतीला रस्ते नाही, जंगली जनावरांचा नाहक त्रास शेतकरी वर्गाला होत आहे. पावसाळ्यात नदीला पूर येणे यावर काहीही नियन्त्रण नाही. शासनाचे, सरकारचे राजकिय नेत्यांचे काहीही लक्ष या भागाकडे नाही. आम्ही आमच्या भागातील प्रश्न प्रत्येक व्यक्तीकडे मांडलेला आहे आजच नाही तर गेल्या साठ वर्षां पासुन आमच्या भागात तलाव निर्मिती किंवा कालव्याद्वारे पाणी शेती सिंचनासाठी द्या असा प्रश्न लाऊन धरला आहे कित्येक आमदार, खासदार, सरकार, प्रशासकीय अधिकारी बदललेले परन्तु आमच्या भागाची दशा काही बदललेली नाही. आमचे अधिकार आम्हाला यांनी दिलेले नाही. आम्ही प्रश्न मांडावे कोणाकडे फक्त आणि फक्त वेगवेगळया पक्षाचे नेते आश्वासन देतात आणि पाच वर्षाने लाज शरम सोडून मत मागायला येतात. अधिकारी वर्ग फक्त काही कारणे सांगून त्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना असे वाटते कोण लाऊन घेणार. म्हणजे कोणाचीही मानसिकता नाही आमच्या भागात सिंचनासाठी पाणी व इतर समस्या निकाली काढण्याची. फक्त शहराचा विकास होत आहे पण खेड्याकडे कोणाचेही लक्ष नाही. आम्ही उपाशी आहे आमचे जीवनमान पूर्ण खालवलेले आहे. आम्हाला आमच्या शेतीला हक्काचे पाणी द्या. आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे. या भागात जर येणार्या काळात पाण्याची व्यवस्था झाली नाही तर गावे ओसाड पडतील त्यांची सुरुवात झाली आहे दरवर्षी प्रत्येक गावातील आठ ते कुटुंब गाव सोडून कामाच्या शोधात बाहेर जात आहे. आठ ते दहा वर्षात पूर्ण गावे ओसाड पडतील वृद्ध मंडळी गावातच सोयी सुविधा अभावी मरतील अशी दयनीय अवस्था या भागाची होणार आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार राजकिय नेते, प्रशासकीय अधिकारी व सरकार राहतील म्हणून वेळेतच आम्हाला आमच्या भागात शेतीला पाण्याची व्यवस्था करून द्यावी.आमच्या भागातील नागरिकांनी गेल्या 50 वर्षापासून या समस्या बद्दल शासन दरबारीं प्रयत्न केले. परंतु आजपर्यंत हि समस्या मिटली नाही. पिण्याकरिता पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, शेतीला पाणी नाही. दरवर्षी हंगामी व कायमस्वरूपी स्थलांतर या भागातून होत आहे. जर हा प्रश्न मिटला नाही तर येणाऱ्या काळात हि गावे पूर्णतः ओसाड पडतील. मूलभूत सुविधा या भागात उपलब्ध नसल्याने तरुण वर्ग बाहेर ठिकाणी रोजगाराच्या शोधात भटकत आहे. अत्यन्त दयनीय अवस्था या भागातील आहे. लोकांचे जीवनमान पूर्णतः खालवलेले आहे. नागरिकांनाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास नाही. येणाऱ्या काळात शासनाने, सरकारने ग्रामस्थांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा. ग्रामस्थांच्या वतीने प्रश्नाला प्राथमिकता देऊन सोडवायला पाहिजे हि सर्वांची मागणी आहे.(डॉ.प्रा.तुषार नायकुजी)