वर्धा / स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय,वर्धा येथे वर्ग 10 वी च्या 90 विधार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. कार्यक्रम अध्यक्ष मुख्यध्यापक विनय बुरघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार व प्रसिद्धी प्रमुख गजानन जिकार होते. जिकार यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जनता संकलित ग्रंथ देऊन विद्यालयानी गौरव केला.’मा. शंकरराव कोल्हे, सहसचिव, तेरव चित्रपट कलाकार धनंजय परळीकर माजी विध्यार्थी, मॅक्स कॉम्प्युटर इन्स्टिटयूट संचालिका भैरवी गंडोले, व सहकारी देवेंद्र घोटेकर, उपमुख्याध्यपक श्री उमरकर, माजी मुख्याध्यापक येंडे, ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी गजानन जिकार म्हणाले, विध्यार्थी मित्रांनो परीक्षा जवळ येत आहे. ”आता धरा एकच ध्यास, करा अभ्यास, पूर्ण करा तुमच्या ठरविलेल्या स्वप्नास, यशस्वी होईल जीवनाचा प्रवास ”उपस्थित मान्यवरांनी तसेच वर्ग 10 च्या मुलां मुलींनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केले निरोप घेतांना व देतांना विध्यार्थी व शिक्षक फारच भावुक झाले काहींना अश्रू आवरता आले नाही . वर्ग 5 वी ते 10 वी प्रवासाच्या गोड आणि कडू आठवणी व अनुभव कथन केले. समारंभ नियोजन व कार्यक्रम प्रास्ताविक वर्ग 10 वी चे शिक्षक पुंडलिक नागतोडे यांनी केले. संचालन दीपाली मालपे तर आभार वैशाली चिवाने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तन मन धनाने सहकार्य केले.