दिल्ली येथे चालत असलेल्या बनावट कॉल सेंटरवर वर्धा पोलीसांचा छापा
एअरलाईन्स मध्ये नोकरी,खोटे क्रेडीटकार्ड व खोटे लोन देवून करीत होते फसवणूक
बॅंक अकाऊंट व सिम कार्ड घेण्याकरीता तयार केले खोटे आधार कार्ड व पॅन कार्ड
बदरपूर, साऊथ दिल्ली येथील उच्चभ्रु परिसरात चालवीत होते कॉल सेंटर
गुन्हयातील फसवणूकीची रक्कम 89,000/-रू आरोपीतांकडून हस्तगत.
मोबाईल, चार्जर, राऊटर व तर साहित्यासह एकूण ३ लाख २४हजार ९०० रू चा माल जप्त
सहासिक न्यूज-24
अविनाश नागदेवे/वर्धा
दिनांक १ जून रोजी फिर्यादी घरी हजर असतांना फिर्यादी प्रांजली दिनेश चुलपार, वय १९ वर्षें, रा. सिध्दार्थनगर,बोरगांव मेघे,वर्धा व यांची आई शालू दिनेश चुलपार हिच्या मोबाईलवर फिर्यादी यांनी लोकल जॉब सर्च अपडेट नावाची अँप डॉउनलोड केली व ती अॅप उघडून त्यामध्ये फॉर्म भरला असता फिर्यादी हिला दिनांक ८जून 06 रोजी (9990593446)या क्रमांकवरुन फोन आला व त्या वेळी त्यांनी फिर्यादी यांना सांगितले की,तुम्ही एअर ईंडिंयामध्ये नोकरी करीता फॉर्म भरलेला होता त्यामध्ये तुमची निवड झालेली आहे.असे सांगून फिर्यादी यांना विश्वासात घेवून मो.क्र. (8800694308),(9990593446),(9599868404),(9990873385),चे अज्ञात मोबाईल धारकांनी वारवांर फिर्यादी यांचेशी संपर्क करुन फॉर्म भरण्याकरीता फी,फाईल पास करण्याकरीता रक्कम,जाॅयनींग लेटर पाठविण्याचे कारणाने रक्कम असे सांगून एकूण ८९हजार,५००रू फोन-पे आयडी – (authorityofindia239@okicici) विक्रम मल्होत्रा – (9205646590@ybl) वर भरायला लावले.गुन्हयातील अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी प्रांजली दिनेष चुलपार,वय १९ वर्षें,रा.सिध्दार्थनगर, बोरगांव मेघे,वर्धा यांना नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक केल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 03/2023 कलम 419,420,भादंवि सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक नूरूल हसन यांनी सदर गुन्हयात अधिक बारकाईने तपास करण्याकरीता व अज्ञात स्थळावरून चालत असलेल्या नोकरीचे आमीष देवून लूबाडणा-या खोट्या कॉल सेंटरची पाळेमूळे शोधून काढण्याकरीता विशेष लक्ष देवुन तपासी अधिकारी व सायबर पो.स्टे.चे कर्मचारी यांना मागर्दशन केले.
गुन्हयाचे संबंधाने जूजबी तांत्रीक माहिती काढून सदर गुन्हा हा फरीदाबाद हरीयाणा व बदरपूर, साउथ दिल्ली या भागातून झालेला असल्याचे प्राथमीक तपासात दिसून आले.त्यावरून पो.उप.नि. सिनूकूमार बानोत,पो.स्टे.वर्धा शहर सोबत पो.हवा. कुलदीप टांकसाळे,पो.हवा. निलेश तेलरांधे,ना.पो.शि.अमीत शुक्ला,ना.पो.शि.अनूप कावळे यांना दिल्ली येथे तपासकरीता रवाना करण्यात आले.सतत ७ दिवस केलेल्या तपासाअंती गुन्हयात वापरण्यात आलेले सीम कार्ड व बॅंक अकाऊंट ज्या विक्रम मलहोत्रा,रा. डीए १९०५,डबूआ कॅालनी, फरीदाबाद,हरीयाणा याचे नावाने आहेत हा व्यक्ती अस्तीत्वातच नसल्याचे स्पष्ट झाले.आरोपीने स्वतःची ओळख लपविण्याकरीता खोटे आधार कार्ड व पॅन कार्ड तयार केलेला आहे.त्यामूळे फरीदाबाद हरीयाणा व बदरपूर,साउथ दिल्ली येथे बातमीदार नेमून व संबंधीत पोलीस ठाणे येथून योग्य ती मदत घेवून त्यांचा षोध घेण्यात आला.
मोलारबाद एक्सटेंशन,मोहन बाबा नगर,ताजपूर रोड या पो.स्टे.बदरपूर साऊथ दिल्ली या परीसरातील पाहणी व शोध दरम्यान काढण्यात आलेल्या माहितीप्रमाणे मेन ताजपूर रोड,भारत पेट्रोलपंपला मागच्या बाजूस,मोहन बाबा नगर,बदरपूर असलेल्या २ मजली इमारतीमध्ये पहील्या माळयावर ईझीगो नावाचे कंपनीच्या आतमध्ये अनेक महिला व पूरूष लोन,जॉब,क्रेडीट कार्ड या कारणाने त्यांना दिलेल्या यादी प्रमाणे फोन करीत असून त्यांना रक्कम जमा करावयास लावतात अशी माहिती मिळाली.याप्रमाणे शहानीशा व खात्री करून सदर ठिकाणी छापा घालण्यात आला.छाप्यादरम्यान फसवणूकीचे कॉल करण्यात येत असलेले एकूण २६मोबाईल फोन,२०सिम कार्ड,७ चार्जर,इंटरनेट वापरकरीता असलेले राऊटर,फसवणूक करण्याकरीता लोकांशी काय बोलायचे आहे याची नोंद असलेले रजिस्टर,आरोपीने खोट्या कंपनीच्या नावाने जस्ट डायल या प्रस्थापीत कंपनीकरीता घेतलेली सामान्य नागरीकांचे नांव,मोबाईल नंबर,पॅन कार्ड यांची यादी असा किंमत २लाख३५हजार,९००रू चा माल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.
यात आरोपी १)आकाश सुभाष सहानी,वय ३० वर्ष राहणार डी-४८ गली नंबर १,मोहन बाबा नगर, बदरपूर,दिल्ली 2) राकेश रामप्रकाश राजपूत वय २६ वर्ष राहणार ए-६७ गली नंबर २ मिठापूर एक्स्टेंशन, बदरपूर,दिल्ली यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना गुन्हयांसंबंधाने अधिक विचारपूस केली व गुन्हयातील फसवणूकीची एकूण रक्कम रूपये ८९ हजार, आरोपींतांकडून जप्त करण्यात आले.
याप्रमाणे सदर गुन्हयात जप्त मुद्येमाल व फसवणूकीची रक्कम असा ३लाख,२४,हजार रू चा माल जप्त करण्यात आला.घटनास्थळी मिळून आलेल्या कॉल सेंटरचे काम करणाऱ्या ७ महिलांना तपासार्थ हजर होण्याकरीता नोटीस देण्यात आला आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक वर्धा नूरूल हसन,अपर पोलीस अधिक्षक सागर रतनकूमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कांचन पांडे व सहा.पोलीस निरीक्षक संदिप कापडे यांचे निर्देषाप्रमाणे पोउपनि सिनूकूमार बानोत व पोलीस अंमलदार दिनेश बोथकर,निलेश कट्टोजवार,कुलदीप टांकसाळे,मिना कौरती,विशाल मडावी,अनुप कावळे,अक्षय राऊत, गोविंद मुंडे,अंकीत जिभे,स्मिता महाजन सर्व नेमणुक सायबर सेल, वर्धा व पोलीस अंमलदार वैभव कट्टोजवार,निलेश तेलरांधेरंजीत जाधव,अनुप राऊत,अमित शुक्ला, लेखा राठोड,प्रतिक वांदिले सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांनी केली.