देवळी तालुक्यात गारपीट व पावसाचा कहर…

0

गहू आणि हरभऱ्याचे ७० टक्क्याच्यावर नुकसान.

निसर्गाच्या प्रकोपामुळे शेती व्यवसाय उध्वस्त.

देवळी / तालुक्यामध्ये दोन दिवस झालेल्या गारपीट व पावसामुळे गहू,हरभर,तुरी,या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून ७० टक्क्याच्या वर नुकसान झाल्याचा पाहणी मध्ये अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील विजय गोपाल,रोहणी, फत्तेपूर, इंझाळा,मुरदगाव खोसे,भिडी,रत्नापूर,ईसापूर वाटखेडा,डिगडोह,दिघी बोपापूर,तांबा, कांदेगावं,हिवरा,या गावाचा समावेश आहे.शेतीतील गहू,हरभरा,तुरी या पिकासोबतच भाजीपाला संत्रे, मोसंबी,पपई,या पिकांना सुद्धा जबर फटका बसला असून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले आहे.गहू पीक जोरदार हवा आणि पावसामुळे भुई सपाट झालेला आहे.हरभरा या पिकाला गारपीट चा मार बसल्याने हरभरा पिक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातून गेलेला आहे. दोन दिवसाच्या वादळी आणि गारपीट पावसामुळे शेतातील पिके अक्षरशः उध्वस्त झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले आहेत.कापूस पिक भाव नसल्यामुळे आर्थिक नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतांना परत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याला शासकीय मदत करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे.या आधी नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचा पीक विमा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी अर्ज केले पण त्यांना कवडीचाही पिक विमा मिळालेला नाही परत आलेल्या या नैसर्गिक प्रकोपामुळे परत पिक विमा नोंदवून आर्थिक मदत मिळणार की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. नुकसानीची पीक पाहणी तालुक्यामध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता खा. रामदास तडस,आ.रणजीत कांबळे, कृषी उत्पन्न बाजार सभापती मनोज वसु,भाजपचे राजेश बकाने,तहसीलदार दत्तात्रय जाधव,मंडळ अधिकारी नुरले, तलाठी अजय नागे,सुलभा राऊत,कृषी अधिकारी,पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी,यांनी झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतीची पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

सागर झोरे साहसिक न्यूज /24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!