देवळी येथे तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

0

🔥देवळी येथे तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.🔥आत्महत्येचे कारण मात्र अध्याप गुलदस्त्यात?

देवळी -/ आंबेडकर नगर येथे पटेल किराणा दुकान च्या बाजूला सत्तार खा पठाण यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या खुर्शीद अली आबाद अली खान वय 36 वर्ष राहणार सुंदरपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम देवळी याने आपल्या राहत्या घरी रात्रीच्या वेळेस गळफास घेऊन आत्महत्या केली.

            प्राप्त माहितीनुसार खुर्शीद अली व त्याचा मोठा भाऊ अर्शद अली वय 40 हे दोघे महालक्ष्मी टीएमटी मध्ये ड्रायव्हिंग करीत होते आणि आपल्या परिवारासोबत आंबेडकर नगर येथे सत्तार का पठाण यांच्या घरी भाड्याने राहत होते. मुतकाची पत्नी तीन दिवसा अगोदर लग्न समारंभाकरिता गावाला गेली होती. मृतक याने रात्री आपल्या भावासोबत जेवण करून झोपला परंतु सकाळी त्याला कामावर जाण्यासाठी फोन केला असता त्यांनी उचलला नाही आणि घराचा दरवाजा ठोकला तरी उघडे ना त्यामुळे त्याच्या घराचा दरवाजा तोडून आत शिरण्यात आले. तेव्हा मृतकाचा मृतदेह घराच्या किचन रूम मध्ये साडी ने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळला.त्यामुळे आरड ओरड झाली.

            आणि लोक जमा होने सुरू झाले. त्यावेळी उपस्थिततांनी देवळी पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलीस दोन तास उशिरा घटनास्थळी पोहोचली त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये रोष होता. मूर्तकाचा पंचनामा करून मृत्यू देह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. मृत्यूची कारण समजू शकले नाही. मृतकाचा भाऊ अर्शद अली याच्या फिर्यादीवरून देवळी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

           सागर झोरे साहसिक       News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!