🔥सेलूच्या न्यायालय परिसरात पाणपोईचा श्रीगणेशा.! साहसिक जनशक्ती संघटनेचा भर उन्हाळ्यात दिलासादायक उपक्रम.
सेलू -/ वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ‘साहसिक जनशक्ती संघटने’च्या वतीने पाणपोई उभारण्यात आली. या दिलासादायक उपक्रमाचे उद्घाटन गजभिये मॅडम व सहाय्यक अधीक्षक गावंडे मॅडम यांच्या हस्ते आज बुधवारी करण्यात आले.उन्हाळ्यात तापमानाचा पारा चढत असताना न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोटंबकार यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यावेळी सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नारायणराव काळे तसेच रवींद्र कोटंबकार प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक दुबे, थाटे, मुंजेवार यांनी सहकार्य केले. याप्रसंगी अॅड. रामप्रसाद लिल्हारे, अॅड. राहुल पाटील, अॅड. कपिल मगरे यांच्यासह संतोष डाखोळे गुरुजी, शीतलप्रसाद पांडे, पवन रहांगडाले, अर्जुन पाठक, रोहित तिवारी, गजानन सूर्यवंशी, विठ्ठल कावळे, रामकृष्ण मानकर, अशोक राऊत, सागर राऊत आदींसह न्यायालयातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.न्यायालय परिसरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त केली जात आहे.